मावळातील खांडी गावात घडली दुदैवी घटना
सागर घोडके/पुणे
मावळ – बुधवारी बैलपोळा असल्याने मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राज देशमुख हा बैल आणण्यासाठी साठी गेला असता विज पडल्याचा मोठा आवाज ऐकू आला. आवाज ऐकू येताच राज चे वडील भरत देशमुख पाहण्यासाठी गेले . त्यानी राजला आवाज दिला आसता काही उत्तर आले नाही. आजुबाजूच्या परीसरात पाहीले आसता खांडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली राज पडलेला दिसला.
जवळ जाऊन पाहिले आसता राजच्या कानातून रक्त आले होते. डोक्यावरील केस जळाले होते . घटना स्थळी पोलीस निरीक्षक विलास भोसले, पोलीस निरीक्षक विजय वडोरे , किरण नांगरे, सिद्धार्थ वाघमारे, सचिन काळे यांनी घटना स्थळी भेट दिली. विज पडल्याचे लक्षात आले आसता तातडीने कान्हे फाटा येतील ग्रामीण रुग्णालय दाखल केले. उपचार सुरू केला आसता तपासणीदरम्यान मुत्यु झाल्याचे समजले .
बैल आणण्यासाठी गेलेल्या राजचे वय हे १४ वर्ष होते. विज अंगावर पडल्याने राजचा जागीच मृत्यू झाला होता. असे डॉक्टरांनी सांगितले. शेतकरी सण म्हणून सर्वठिकाणी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण देशमुख शेतकरी घरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.