मनपा आयुक्त राजेश मोहिते यांचे निर्देश : लसीकरणासाठी मनपा अॅक्शन मोडवर
संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
चंद्रपूर, ता. ३० : मागील दोन-तीन महिन्यात झालेल्या लसीकरणामुळे तिसरी लाट रोखून धरण्यात यश येत आहे. मात्र, कोरोना समूळ नष्ट करण्यासाठी १०० टक्के लसीकरण आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांशी थेट आणि सतत संपर्कात राहणाऱ्या फेरीवाले, दुकानदार व इतर सेवादार यांनी कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक आहे. येत्या दोन दिवसात लसीकरण करून घ्या, अन्यथा कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक गुरुवारी दुपारी घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विपिन पालिवाल, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अमोल शेळके आदींसह शहरी नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक उपस्थिती होती.