BREAKING NEWS:
चन्द्रपुर

कामगारां वरील हल्ले आणि अश्लील वागणूक खपवून घेतले जाणार नाही :- राजु शंकरराव कुडे आप शहर सचिव

Summary

संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. चंद्रपूर- दिनांक २५/०९/२०२१ ला सेंटर फॉर डेवलोपमेंट कमुनिकेशन चंद्रपूर येथे कार्यरत कर्मचारी श्री सचिन जीवने याला तेथील मॅनेजर अविनाश कोतपल्लीवार यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना आशीर्वाद सभागृह जवळील CDCC कार्यालयात घडली. महानगरपालिकेचे […]

संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….

चंद्रपूर- दिनांक २५/०९/२०२१ ला सेंटर फॉर डेवलोपमेंट कमुनिकेशन चंद्रपूर येथे कार्यरत कर्मचारी श्री सचिन जीवने याला तेथील मॅनेजर अविनाश कोतपल्लीवार यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना आशीर्वाद सभागृह जवळील CDCC कार्यालयात घडली.

महानगरपालिकेचे कचरा संकलन करण्याचे काम या CDCC कंपनीला मागील ५-६ वर्षापासून मिळालेले असून तिथे कार्यरत अविनाश कोतपल्लीवर नावाचा संबधीत अधिकारी हा आपल्या कर्मचाऱ्यां सोबत क्रूरतेने वागत असल्याचे तक्रार तेथील तेथील वाहन चालक,सुपर वायाजर, हाथ ट्रॉली, कामगार हे वारंवार करीत आले आहे.परंतु महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष करत असल्याचे कामगार युनियनचे सदस्य यांनी म्हटले आहे. महानगर पालिका आणि CDCC या कंपनीच्या व्यवस्थापनाच्या या उदासीनतेमुळे क्रूर व्यक्तीचे आपल्या कर्मचाऱ्यांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाही आहे, दिनांक २५/०९/२०२१ ला तेथील कर्मचारी श्री सचिन जीवने या व्यक्तीवर अश्लील शिवीगाळ करून त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. ज्या मध्ये त्याचा डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. याबाबत पिडितेने रामनगर पोलीस स्टेशन ला त्या व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली. तसेच स्वतः पीडित व कामगारानी आम आदमी पार्टी कडे तक्रार दाखल केली.
त्या अनुषंगाने आज दिनांक ३०/०९/२०२१ महानगर पालिकेचे आयुक्त मोहिते साहेब यांना संबधीत कर्मचाऱ्यावर सक्तीने कारवाई करत कंपनीला त्या व्यक्तीवर निलंबित करण्याचे आदेश द्यावे. जेणकरून भविष्यात अश्याप्रकरचे कृत्य कुणी करणार नाही अशी विनंती मनपा प्रशासनाला केली.
यावेळेला आप चे शहर सचिव राजु भाऊ कुळे, बाबुपेठ प्रभाग संयोजक निखिल बारसागडे, सुरेन्द्र जीवने,जयदेव देवगडे, युवा जिल्हा अध्यक्ष मयूर भाऊ राईकवार, प्रवीण चुनारकर, शैलेश सोंकुसारे, अंकुश राजूरकर, शंकर भाऊ निखाडे, सोशल मीडिया प्रमुख राजेश भाऊ चेडगुल्वार, कालिदास ओर्के, झोन संयोजक सुखदेव दारूनडे, श्रीमती सुजाता बोदेले, ऐश्वर्या वासनिक, अंजू रामटेके, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *