राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी ची भंडारा येथे सभा संपन्न

माननीय नेते श्री. प्रफुल्लभाई पटेल, सौ. सुप्रिया ताई सुळे, श्री. राजेंद्रजी जैन, श्री. नानाभाऊ पंचबुद्धे, श्री. धनंजयजी दलाल, श्री. सुनीलजी फुंडे, श्री. जयंतजी वैरागडे, श्री. राजुभाऊ कारेमोरे, कु. सक्षनाताई सलगर, सौ. सरिताताई मदनकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा भंडारा ची बैठक आज दि. २९/०९/२०२१ रोजी पार पडली.
सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी प्रदेश उपाध्यक्ष मा. मनीषाताई काटे व नागपूर विभागीय अध्यक्ष ॲड. कु. मेघाताई रामगुंडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी युवतींना संबोधित करताना “राजकिय क्षेत्रात युवतींचा दृष्टीकोन व सहभाग” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना म्हणाले की, मुलींनी शिक्षणा सोबत राजकारण या विषया कडे दुर्लक्ष करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज ज्या पद्धतीने तरुण तरुणी जुळून काम करीत आहेत तेव्हा येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित आहे.*
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कु. स्वार्थी करमकर, कु. पायल खवास, जिल्हा महासचिव पुण्यशीला ताई कांबळे, शिल्पा शिंगाडे, जिल्हा सचिव श्रुति कावळे, जिल्हा कोषाध्यक्ष कु. पद्मा देशकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ॲड. कु. नेहा शेंडे यांनी केले होते.
कार्यक्रमास मोहाडी तालुकाध्यक्ष कु. तारा हेडाऊ, शहर उपाध्यक्ष पल्लवीताई रोटकर, रितूताई पडवार, सचिव कु. वैष्णवी वंजारी, समन्वयक कु. सिध्दी अजय वैद्य, कोषाध्यक्ष किर्ती बोरकर, सौ. हर्षाताई वैद्य, सौ. राधिकाताई तितिरमारे, रिनाताई गजभिये, शुभांगीताई नंदनवार, राणी रामटेके, उपस्थित होते.