बनपुरी येथे पंजाब बॅंक व्दारे ग्राम संपर्क अभियान कार्यक्रम संपन्न. पंजाब नॅशनल बॅके कन्हान चा बनपुरी गावात उपक्रम.
जिल्हा नागपूर (कन्हान : ) वार्ता:- पारशिवनी तालुक्यातील बनपुरी येथे पंजाब नॅशनल बॅंक शाखा कन्हान व्दारे आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत ग्राम पंचायत बनपुरी च्या आवा रात ग्राम संपर्क अभियान राबवुन ग्रामि ण गावक-यांना बॅंकेच्या विविध योजनाचे मार्गदर्शन करून २३ लाखाच्या कर्ज देण्याची स्विकृती देण्यात आली.
पंजाब नॅशनल बॅंक शाखा कन्हान प्रबंधक गोपाल धोंगडी, कृषी अधिकारी सचिन कसारे, श्रीमती स्वेता पटले, सरपं च संजय गजभिये, अशुतोष रामटेके यां च्या प्रमुख उपस्थितीत कन्हान पासुन १२ कि मी अंतरावर असलेल्या बनपुरी गावच्या सामान्य जनतेचा त्रास लक्षात घेत बॅंक जनतेचा दारी या मताचे असणा रे बॅक प्रबंधक धोंगडी यांनी संपर्क अभि यान अंतर्गत ग्राहकांना विविध योजनेचे तेवीस लाखाचे कर्ज स्वीकृत करण्यात आले. तसेच उपाययोजना विषयी माहि ती दिली. पंतप्रधान विमा योजना, किसा न क्रेडिट कार्ड, ट्रॅक्टर व इतर चारचाकी, दुचाकी वाहन खरेदी कर्ज, शिक्षण कर्ज, गृहकर्ज, बॅकेचे ‘पंजाब वन ‘ अॅप आदी विषयावर सविस्तर माहितीचे मार्गदर्शन करण्यात आले. गावक-यानी प्रत्यक्ष सं वाद साधुन समस्या मांडल्या. बॅंक अधि का-यानी सर्व शंका, समस्यांचे निराकरण केले. मंडल कार्यालय नागपुर चे कृषी अधिकारी यांचे हस्ते ग्राहकास स्वीकृत पत्र देण्यात आले. सचिन कसारे व स्वेता पटले यांनी बॅंकेचा अन्य योजनासह पेंश न योजना, आरोग्य विमा योजना, अपघा ती विमा योजना आदीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रस्तावना आशुतोष रामटेके यांनी केले तर आभार संरपच संजय गजभिये यांनी मानले.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
9579998535