सिल्लोड

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मोठेपणा कार्यक्रमात वाद्य वाजविणाऱ्या दलित व्यक्तीच्या हाताने केले उदघाटन

Summary

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.26, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. एका कार्यक्रमात उदघाटनासाठी आलेल्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याच कार्यक्रमात वाद्य वाजविणाऱ्या एका दलित व्यक्तीला बोलावून या उदघाटनाचा मान दिला. मंत्र्यांनी […]

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.26, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. एका कार्यक्रमात उदघाटनासाठी आलेल्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याच कार्यक्रमात वाद्य वाजविणाऱ्या एका दलित व्यक्तीला बोलावून या उदघाटनाचा मान दिला. मंत्र्यांनी दिलेल्या मानसन्मानाने वाद्य वादक भारावून गेले. यानंतर दिवसभर ही चर्चा चांगलीच रंगली.

शनिवार ( दि.25 ) रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच शिवसेना, युवासेना व शिवसेना महिला आघाडी शाखा नामफलकाचे अनावरण निमित्त राज्यमंत्री अब्दुल सत्तार भवन जि. प. सर्कलच्या दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्त गव्हाली येथे नियोजित उदघाटन कार्यक्रमासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार आले होते. यावेळी कार्यक्रमात उदघाटन साठी गावातील पुंडलिक कांबळे हे वाद्य वाजवीत होते. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘त्या’ वाद्य वाजविणाऱ्या पुंडलिक ला आवाज देत उदघाटनाचा मान दिला. मंत्र्यांनी दिलेला या मानामुळे वाद्य वादक पुंडलिक कांबळे भारावून गेले. एऱ्हवी ‘वाजव आणि बंद कर’ इतपत कार्यक्रमात फारसे कोणाचे लक्ष नसलेल्या या वाद्य वादकाला मंत्र्यांनी स्वतःचा उदघाटनाचा मान दिल्याने दिवसभर ही चर्चा चांगलीच रंगली.
———————————————-

दरम्यान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा हा पहिला प्रसंग नाही. कधी गावातील ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, विद्यार्थी, महिला बचत गट तर कधी गावातील अपंग व्यक्तीच्या हाताने राज्यमंत्री अब्दुल सत्तार उदघाटन करतात. सामान्य माणसा बरोबरच बालगोपाळात मिसळण्याचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा स्वभाव आहे. त्यामुळेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आगमन होताच प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत चाहत्यांचा कायम गराडा पहायला मिळतो.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, भवन सर्कल प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, हनिफ मुलतानी, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, तालुकाप्रमुख धैर्यशील तायडे, अक्षय मगर, नॅशनल सुत गिरणीचे संचालक मारुती पा. वराडे, विजय खाजेकर, विश्वास दाभाडे, सुखदेवराव जाधव, राजुमिया देशमुख , शिवसेना महिला आघाडीच्या मिराताई शिंदे, शांताबाई कावले, कमलबाई जैस्वाल ,नायब तहसीलदार शैलेश पटवारे, मंडळ अधिकारी एस.एम. जैस्वाल, जि. प. बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता कल्याण भोसले, मुख्यमंत्री सडक योजनेचे सुनील गुडसुरकर यांच्यासह गावातील सरपंच रमेश शिंदे, गणेश शिंदे, माधवराव शिंदे, दामोदर शिंदे, साईनाथ शिंदे, रमेश शिंदे, कैलास शिंदे, गोरखनाथ शिंदे, नारायण शिंदे आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *