अखेर चंद्रपूर गोंदिया पॅसेंजर रेल्वे 28 सप्टेंबर धावणार….

संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
चंद्रपूर :- रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चंद्रपूर ते गोंदिया रेल्वे मार्गावर बल्लारशाह मेमू सुरू करण्याची घोषणा रेल्वे विभागाने केली आहे. या बातमीमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.
24 सप्टेंबर रोजी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूरच्या मुख्य परिचालन व्यवस्थापकाच्या कार्यालयाकडून पत्र जारी करून याबाबत माहिती देण्यात आली आहे.या पत्रातील माहितीनुसार, गोंदिया ते बल्लारशाहकडे धावणाऱ्या MEMU पॅसेंजर ट्रेन 28 सप्टेंबरपासून नियोजित वेळेवर सुटेल, तर बल्लारशाहहून निघून गोंदियाला पोहोचेल. यामुळे या पॅसेंजर गाड्या सुरू होण्यासाठी मागील दीड वर्षांपासून असलेली प्रतीक्षा संपली आहे.
रेल्वे विभागाने मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक्स्प्रेससह काही पॅसेंजर गाड्या बंद केल्या होत्या. यात गोंदिया येथून संचालन होणार्या इतवारी, बालाघाट, बल्लारशहा या पॅसेंजर गाड्याही बंद करण्यात आल्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून परिस्थिती पूर्व पदावर आली आहे. सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहे. मात्र, पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता, तर भाजीपाला विक्रेते आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी जीवनदायिनी असलेल्या या पॅसेजर गाड्या बंद असल्याने अनेकांचा रोजगार हिरावला होता. ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांना एसटी प्रवास करण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत होते. त्यामुळेच पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्याची मागणी केली जात होती. अखेर रेल्वे विभागाने तब्बल 18 महिन्यांनंतर पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वे विभागाने यासंदर्भातील पत्र शनिवारी जारी केले आहे.
मंगळवारपासून गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बालाघाट, बिलासपूर-कटनी, तुमसर-तिरोडी, नागपूर-रामटेके-इतवारी या पॅसेंजर गाड्या सुरू होणार आहेत. मात्र, या गाड्यांमध्ये पूर्वीचप्रमाणेच रेल्वे स्थानकावरून तिकीट घेऊन प्रवास करता येणार की आरक्षण करावे लागणार याबाबत रेल्वेने अद्यापही स्पष्ट केले नाही. सोमवारी यासंदर्भातील दिशा निर्देश प्राप्त होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकार्यांनी सांगितले. पॅसेंजर आणि लोकल गाड्या बंद असल्याने प्रवाशांना एसटीने प्रवास करावा लागत होता. गोंदिया ते चंद्रपूर प्रवासाठी तब्बल 300 रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर मंगळवारपासून धावणार असल्याने प्रवाशांना यासाठी केवळ 50 ते 60 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावरील भार कमी होणार आहे.