राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली बाधित क्षेत्राची पाहणी पीडितांना किराणा किट व जीवनावश्यक वस्तूचे केले वाटप
Summary
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.23, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज शुक्रवार रोजी तालुक्यातील बाभूळगाव, केऱ्हाळा, बनकीन्होळा, वरखेडी- भायगाव आदी गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जावून पाहणी केली. तसेच अतिवृष्टीत घरांचे पडझड झालेल्या पीडितांना शिवसेनेच्या वतीने राज्यमंत्री […]

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.23, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज शुक्रवार रोजी तालुक्यातील बाभूळगाव, केऱ्हाळा, बनकीन्होळा, वरखेडी- भायगाव आदी गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जावून पाहणी केली. तसेच अतिवृष्टीत घरांचे पडझड झालेल्या पीडितांना शिवसेनेच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते किराणा किट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सरसकट पंचनामे करण्याचे काम सुरू असून येत्या काही दिवसांत पंचनामे पूर्ण होतील. पंचनामा पासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहता कामा नये , अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या विहिरी देखील खचलेल्या असून अनेकांच्या घराची पडझड झालेली आहे याबाबत पंचनामे करीत असताना प्रशासनाने दक्षता घ्यावी असे निर्देश देत कोकण , कोल्हापूरच्या धर्तीवर नुकसानग्रस्तांना शासनाकडून निश्चितपणे मदत मिळेल. त्यामुळे नुकसानग्रस्तांनी चिंता करू नये असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
औरंगाबाद – जळगाव रत्याचे काम सुरू असतांना कंत्राटदाराच्या चुकीमुळे बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी तुंबले. यामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले. त्याशिवाय रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांना यापासून धोका निर्माण झाला आहे . त्यामुळे सदरील पाणी काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जि.प.बांधकाम सभापती किशोर बलांडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, डॉ. संजय जामकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतीश ताठे, युवासेनेचे अक्षय मगर,विजय खाजेकर,जमीर मुलतानी यांच्यासह वरखेडी सरपंच शोभा दादाराव सिरसाट, उपसरपंच समाधान पाटील, केऱ्हाळा सरपंच सविता दत्ता कुडके, बनकीन्होळा सरपंच प्रल्हाद फरकाडे, मंडळ अधिकारी एस.एम. जैस्वाल, विस्तार अधिकारी पी.बी. दौड, एस.एल.इंगळे, तलाठी एन. ए. गुरे, ग्रामसेवक नंदकिशोर गव्हाणे,श्रीमती पूजा नेवरे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश फलके, सोनल जैस्वाल, अंकुश फरकाडे , दत्ता भगत, दत्ता कुडके, शिवाजी कुमावत,शेख युसुफ, विनायक पांढरे, गणी शेख , नामदेव पांढरे, सांडू खासाब, भावलाल राजपूत आदींची उपस्थिती होती.