चन्द्रपुर हेडलाइन

२७ सप्टेंबर २०२१ रोजी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला आम आदमी पार्टीचा पाठिंबा व सक्रिय सहभाग.

Summary

संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य… जय जवान जय किसान ! केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मंजूर केलेल्या कायद्यांना आम आदमी पार्टीचा विरोध असून त्या विरोधात चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपण सुरुवातीपासून पाठिंबा दिला आहे. या आंदोलनास एक […]

संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…

जय जवान जय किसान !

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मंजूर केलेल्या कायद्यांना आम आदमी पार्टीचा विरोध असून त्या विरोधात चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपण सुरुवातीपासून पाठिंबा दिला आहे. या आंदोलनास एक वर्ष पूर्ण होऊनसुद्धा केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला नसून भाजपा सरकार कडून हे आंदोलन मोडून काढण्यासाठी कुटील प्रयत्न केले गेले आहेत. आत्तापर्यंत अनेक आंदोलनकर्ते शेतकरी शाहिद झाले असून सुद्धा केंद्र सरकार अत्यंत असंवेदनशील पद्धतीने शेतकऱ्यांशी वागत आहे.

या आंदोलनास एक वर्ष पूर्ण झाले असून केंद्र सरकारचा निषेध करून तीनही कायदे मागे घेण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांनी येत्या सोमवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. आम आदमी पार्टीचा या बंदला सक्रिय पाठिंबा असून राज्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना कळवण्यात येत आहे कि सर्व नियमांचे पालन करत, पक्षाचा झेंडा / बॅनर वापरून आपापल्या गाव, तालुका, जिल्हा व शहर पातळीवर संविधानिक मार्गाने या बंद मध्ये सहभागी व्हायचे आहे.

आम आदमी पार्टी महाराष्ट्राकरिता,
धनंजय रामकृष्ण शिंदे
राज्य सचिव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *