▪ उदरनिर्वाह कठीण, सांगा कसा भरणार टॅक्स▪ ▪ भाजी विक्रेता, कामगार, ऑटो चालक , सलून चालक , घर काम करणाऱ्या महिला, बचत गटांच्या महिला यांनाही भरावा लागतो कर▪ ▪ समाजातील दुर्बल घटकांची करा साठी गंभीर अवस्था▪ ▪कोरोना नंतर लहान व्यवसायिकांना समोर निर्माण झाला मोठा प्रश्न▪
▪महेश देवशोध ( राठोड ) ▪
▪ वर्धा , जिल्हा प्रतिनिधी▪
प्रत्येक व्यक्तीला सरकारचा कुठलातरी कर द्यावा लागतो. त्याची जाणीव प्रत्येकाला असते. लहान मोठा व्यवसाय करणारे , याशिवाय उद्योगपती यांच्यापासून सर्व जण कर भरतात कधी तो केंद्र सरकारचा असतो. तर कधी तो राज्य सरकारचा.
गावात ग्रामपंचायतीपासून महसूल प्रशासनाचाही भर कर भरावा लागतो. मात्र घराच्या मोबदल्यात सर्वसामान्यांना काय दिले जाते. याची जाण अनेक करदात्यांना नसते. त्यामध्ये लहान-मोठे व्यवसायिकही समाविष्ट आहेत. अशा परिस्थितीत अनेकांचा रोजगार गेला. अशा परिस्थितीत त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करणे कठीण झाला. अशा परिस्थितीत कर कसा भरायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे .ऑटोचालक, कामगार ,भाजीविक्रेते, फेरीवाले, सेक्युरिटी गार्ड ,सफाई कर्मचारी, सलून, शाळा , लॉन्ड्री , घरकाम करणाऱ्या महिला यांना ही कर भरणा करणे कठीण झाले आहे.
▪ भाजी विक्रेते▪
कृषी उत्पन्न बाजार समितीने निर्धारित केलेल्या जागेत आपण व्यवसाय करतो. त्यामुळे दररोज त्यांची पावती पाडावी लागते व त्यांना कर द्यावा लागतो.
▪ कामगार▪
गिरणी, उद्योगामध्ये पगार मिळतो त्या मोबदल्यात बराच वेळात टीडीएस सारखे कर कपात केले जातात. काहींना आयकरही भरावा लागतो. आपल्या पैशावर देश चालत असतो, म्हणून कराचा भरणा होत असतो.
▪ ऑटो चालक▪
दरवर्षी शासनाला आरटीओ च्या माध्यमातून वाहनाचा कर दिला जातो.
▪ सलून चालक▪
सलून साठी अनेक वस्तू खरेदी करताना त्यावर जीएसटी आकारला जातो. बील घेतले तर जिएसटी भरावा लागतो. त्यामुळे बऱ्याच वस्तू या कर भरणा करूनच खरेदी कराव्या लागता▪ घर काम करणाऱ्या महिला०
बहुतेक महिला या बचत गटाची निगडित आहे. त्या बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतात. त्यामुळे त्यांच्यावर कराचा बोजा येतो .कर भरणा त्यांनाही करावा लागतो.
▪🔵 शासनाकडे प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या रूपाने कराचा भरणा करीत असतो. या करातून सरकारचे अर्थचक्र चालते. पेट्रोल वर विविध कर आकारले जातात. ते सर्वसामान्य माणसाच्या खिशातूनच वसूल केले जातात. या करामुळे समाजातील दुर्बल घटकांसाठी श्रीमंताकडून पैसे घेऊन ज्यांची ऐपत आहे. अशा लोकांवर कर लादून त्यातून योजना चालविल्या जातात. त्यामुळे करातूनच देश विकासालाही चालना मिळते.
ऍड .संदीप घाईत
अर्थतज्ञ▪🔵
▪पोलीस योद्धा वृत्तसेवा▪▪वर्धा , 73 78 70 34 72▪