फुट ओवर ब्रिज बांधकामाचे आदेश धडकल्याने वरठी येथे संबंधित कार्य जोमात
अमर वासनिक/न्यूज एडिटर
वरठी:- वरठी रेलवे फाटकावर गेल्या चार दशकांपासुन फुट ओवर ब्रिज तयार करण्याची मागणी आहे. याबाबद वरठी रेलवे प्रशासनाने महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले होते. परंतु 10 वर्षे होऊनही कार्यवाही निरंक होती. अधे-मधे रेलवे मजिस्ट्रेट सरप्राइज चेकिंग करायला यायचे म्हणून रेलवे चा कोर्ट असायचा. रेलवे चा कोर्ट असताना वरठी रेलवे फटकातून जर रेलवे कर्मचारी वगळता कोणताही पुरुष कायद्याचे उल्लंघन करीत असेल अर्थात रेलवे फाटक पडले असूनही ते फाटक ओलांडून जात असेल तर पुरुषांना रेल्वे पोलिसांकड़ून बंधक(अटक)बनवले जाई. व त्यांच्यावर शुल्क आकरून त्यांना परत सोडले जाई. चांगल्या मोठ-मोठ्या प्रभावशाली व्यक्ती यांना अटक होत असे व त्यांच्या खिशातिल पैसे रिकामे होत असत. याउलट महिलांना क्वचितच अटक होत असे. कित्येकदा पति पत्नी यांचे सुखी दाम्पत्य जर रेलवे कोर्ट असताना रेलवे फाटक बंद असूनही अनधिकृतपणे प्रवेश करत असतील तर पतीला अटक व्हायची व पत्नीला रेल्वे फाटकाबाहेर जाऊ दिले जायचे. कॉलेज चे विद्यार्थी-विद्यार्थिनी जर का परिक्षेला जात असतील व घाई-गडबडिने रेल्वे फाटक कायद्याचे उल्लंघन करत असतील तर विद्यार्थ्यांना अटक व्यायची तर विद्यार्थिनीना अटक होत नव्हती मग शुल्क आकरुँन त्यांना सोडले जाई. अश्याप्रकारे गेली 40 वर्षापासुन हा त्रास आहे. परंतु मीडिया ने रेलवे फुट ओवर ब्रिज चे प्रकरण उचलल्याने बांधकामास 50% वेग आला आहे.
वरठी-मोहाडी-तुमसर मार्गा वरील अतिक्रमण धारकांना शुक्रवारी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अतिक्रमनधारकाना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. परंतु त्यांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित झालेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबद मदद करणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने या बाबतीत संवेदनशील राहने गरजेचे आहे.
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9309488024