तीन राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती
मुंबई दि 17 : माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्त म्हणून सुरेशचंद्र गैरोला, समीर सहाय, आणि राहुल भालचंद्र पांडे या तिघांची नेमणूक करण्याची अधिसूचना काढण्यात आली.
या तिघांच्या नावांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मान्यता दिली असून राज्यपालांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना काल १६ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली.