पुणे महाराष्ट्र हेडलाइन

किल्ले सिंहगड परिसराचा विकास करताना पर्यावरण आणि पुरातन वारशाचाही विचार करा – उपमुख्यमंत्री अजित पवार किल्ले सिंहगड परिसर विकासाबाबत आढावा बैठक

Summary

पुणे, दि.१७ – किल्ले सिंहगड परिसराचा पुरातन वारसाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरूप असा विकास करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात किल्ले सिंहगड परिसर विकासाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, विभागीय […]

पुणे, दि.१७ – किल्ले सिंहगड परिसराचा पुरातन वारसाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरूप असा विकास करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात किल्ले सिंहगड परिसर विकासाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, परिसरातील वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक वाहनांचा उपयोग करावा. वाहनतळावर वाहनचालकांसाठी देखील सुविधा असावी. पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात यावी. पर्यटकांना इतिहासाविषयी माहिती मिळावी आणि पर्यटनाचा आनंदही घेता यावा हा दृष्टिकोन समोर ठेऊन विकास करावा. येणाऱ्या पर्यटकांना माहिती देण्यासाठी मराठी आणि हिंदी भाषा जाणणाऱ्या स्थानिकांना गाईड म्हणून प्रशिक्षण देण्यात यावे. पर्यटकांना पिठलं-भाकरीसारखे स्थानिक व्यंजन उपलब्ध द्यावेत. किल्ल्याच्या सौंदर्याला कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी,असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी सादरणीकरणाद्वारे किल्ल्याच्या परिसरातील विकास आराखड्याची माहिती देण्यात आली. बैठकीस सिंहगड वनहक्क समितीचे सदस्य आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *