आयपीएल जुगारावर पोलिसांची धाड नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त,तिघांना अटक
वणी वार्ता:-आयपीएल 13 चे सिजन सुरू असून यावर सट्टा लावल्या जात असल्याची गुप्त माहिती वणी पोलिसांना मिळाली यावरून पेटूर शिवारातिल सूतगिरणीच्या मागे सुरू असलेल्या आय पी एल सट्टा पोलिसांनी धाड टाकून तिघांना अटक केली असून 9 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे
तालुक्यातील इंदिरा सुतगीरणीच्या मागे शिरगीरी जंगल परिसरात क्रिकेटच्या सामन्यावर जुगार खेळल्या जात असल्याची गोपनिय माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शोध पथकाला धाडसत्र अवलंबण्याच्या सुचना केल्या. पोलीसांनी शिरगीरी जंगल परिसरात सापळा रचून घटनास्थळावर धाड टाकली. यावेळी कोलकता नाईट रायडर्स व सनराईज हैद्राबाद या दोन संघातील सामना रंगला होता. सामना सुरु असतांना प्रत्येक क्षणाला मोबाईल वरुन हारजीतचा जुगार खेळतांना सय्यद मिनाज सय्यद मुमताज [31], जमशेद हुसेन राशीद हुसेन [23], मंगल विठठल खाडे [32] सर्व रा. वणी या
तिघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांचेकडून आठ मोबाईल संच, क्रेटा चारचाकी वाहन [एम. एच. 29 बी. सी. 2346], पेन, कॅल्सी, व अन्य जुगार खेळतांना लागणारे साहित्य, रोख 1 हजार 250 रुपये असा एकुन 9 लाख 70 हजार 700 रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर भादवी कलम 269,188, 12 [अ] महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्षनांत वैभव जाधव, पीएसआय गोपाल जाधव, सुदर्षन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर, दिपक वांड्रसवार यांनी केली
अतिश सातोकर
विभागीय प्रतिनिधि
अमरावती