BREAKING NEWS:
नागपुर

कन्हान शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करा. क्रिडा मंत्री सुनिल केदार व जि प अध्यक्षा रश्मी बर्वे यांना निवेदन.

Summary

संजय निंबाळकर/उपसंपादक कन्हान : – शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महिला वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्या बाबत तसेच कन्हान पिपरी शहरातील व ग्रामीण भागातील होतकरू क्रिडापटू युवक-युवतींसाठी क्रिडा संकुल उपलब्ध करण्या बाबतचे निवेदन सुनिल बाबु केदार मंत्री पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय […]

संजय निंबाळकर/उपसंपादक

कन्हान : – शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महिला वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्या बाबत तसेच कन्हान पिपरी शहरातील व ग्रामीण भागातील होतकरू क्रिडापटू युवक-युवतींसाठी क्रिडा संकुल उपलब्ध करण्या बाबतचे निवेदन सुनिल बाबु केदार मंत्री पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा आणि जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रश्मीताई बर्वे यांना देण्यात आले.
कन्हान पिपरी शहर हे तालुक्यातील सर्वात मोठी नगरपरिषद असुन अद्यापही प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारी यांची आज पर्यंत स्थायी नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील व आजुबाजुच्या ग्रामीण भागातील उपचार घेणार्‍या महि लांना, युवतींना महिला वैद्यकीय अधिकारी नसल्या मुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारी ची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली. तसेच कन्हान पिपरी शहरात व आजुबाजु च्या ग्रामीण क्षेत्रा तील होतकरू युवक, युवती हे क्रिडापट्टू घडण्याकरीता शहरामध्ये क्रिडा संकुल उभारून उपलब्ध करून देण्यात यावे. अशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार, अशोक मेश्राम, पंकज गजभिये, विनोद येलमु ले, दिपक तिवाडे, रमेश ठाकरे, आनंद भुरे, मिलिंद मेश्राम, शिवशंकर भोयर, कुंदन रामगुंडे, केसरीचंद खगारे, मीना पहाडे, माधुरी गावंडे, शालु कावळे, विमल आकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *