नागपुर

महात्मा ज्योतिबा फुले बहु. संस्थेचा ११ वा वर्धापन दिन रक्तदान शिबीराने साजरा

Summary

संजय निंबाळकर/उपसंपादक कन्हान : – समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहु उद्देशीय संस्था टेकाडी चा ११ वा वर्धापन दिनी रक्तदा न शिबीरात २८ युवक, नागरिकांनी रक्तदान करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. डेंगु चा प्रादुर्भाव असल्याने मोठ्या प्रमाणात रक्त चा […]

संजय निंबाळकर/उपसंपादक

कन्हान : – समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहु उद्देशीय संस्था टेकाडी चा ११ वा वर्धापन दिनी रक्तदा न शिबीरात २८ युवक, नागरिकांनी रक्तदान करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
डेंगु चा प्रादुर्भाव असल्याने मोठ्या प्रमाणात रक्त चा तुडवडा असल्याने कोरोना नियमाचे पालन करून समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहु उद्देशीय संस्था टेकाडी व शिव हेल्थ क्लब व्दारे रक्तदान शिबी राचे आयोजन करण्यात आले होते. आयुष रक्त पेढी याच्या सहकार्याने गावातील २८ युवक व नागरिक रक्तदात्यानी रक्तदान करून महात्मा ज्योतिबा फुले बहु. संस्थेचा ११ वा वर्धापन दिन थाटात साजरा केला . याप्रसंगी मा शरद डोनेकर माजी उपाध्यक्ष जि प नागपुर, मा रमेश कारामोरे जिल्हाध्यक्ष प्रहार नागपुर जिल्हा, सरपंचा मीनाक्षी बुधे, श्यामकुमार बर्वे उपसर पंच कांद्री, सुरेंद्र बुधे उपाध्यक्ष भाजपा पारशिवनी तालुका, दिनेश चिमोटे ग्रा प सदस्य टेकाडी, पत्रकार मोतीराम राहटे, कमलसिंह यादव, ऋृषभ बावनकर, सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र सिंगर, अतुल कुरडकर, श्याम मस्के, अभिजित कुरडकर, केतन भिवंगडे, रितेश जनबंदु, वस्ताद हितेश डाफ, रोशन सोनटक्के, सचिन ढोबळे, गुलशन बोराडे, पियुष बोराडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता स सु महात्मा ज्योतिबा फुले बहु. संस्था टेकडी अध्यक्ष निलेश गाढवे, राजे शिव हेल्थ क्लब, टेकाडी
ग्रामोन्नती प्रतिष्ठान कन्हान, शिव शक्ती आखाडा व
युवा चेतना मंच च्या पदाधिका-यांनी मौलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *