वेकोलि खुली कोळसा खदान वर्कशाप चोरीतील आरोपीना अटक. स्था. गु. अ शाखा पथकाने चार आरोपीना मुद्देमाला सह अटक.

संजय निंबाळकर/उपसंपादक
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि कामठी खुली कोळसा खदान चे बंद वर्कशॉप स्टोर च्या खिडकीचे राॅड तोडुन अज्ञात चोरांनी आत प्रवेश करून एकुण ३०,००० रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केल्याने कन्हान पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने स्था गु शा ना ग्रा पथकाने तीन तासात आरोपीना मुद्देमालासह पकडुन कन्हान पोलीसाना पुढील तपास करिता स्वाधिन केले.
प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.१०) सप्टेंबर ला सायंकाळच्या सुमारास वेकोलि कामठी खुली कोळसा खदान चे वर्कशॉप स्टोर च्या खिडकीचे राॅड तोडुन आत प्रवेश करून स्टोर मध्ये ठेवलेले २५ नग लोखंडी प्रति नग किंमती १२०० रुपये प्रमाणे असा एकुण किंमत अंदाजे ३०,००० रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरून नेला. अश्या फिर्यादी च्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार तपासात घेतला. सदर प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी तीन घंट्यात चोरींचा आरोपी १) राधे मेश्राम वय २२ वर्ष , २) शुभम नेमचंद राऊत २० वर्ष, ३) अजय शिवपूजन गौतम वय २९ वर्ष तिघही राह. कन्हान ४) सोनु साहेल शाहु वय १९ वर्ष राह. कळमना बस्ती अश्या चार ही आरोपींना अटक करून त्यांच्या जवळुन २५ युनिट वजन २५ किलो प्रति युनिट आणि एक महिंद्रा अल्फा प्लस असा एकुण १,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांना सोपविण्या त आले असुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध अप क्र. ३३७/२०२१ कलम ४६१, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई स्थानिक अपराध शाखा नागपुर ग्रामिण चे एपीआई अनिल राऊत, हेडकाॅस्टैंबल विनोद, नाना राऊत, एनपीसी शैलेश, सत्य, पीसी प्रणय, वीरू, दासी साहेबराव सह आदि कर्मचारी यानी यशस्वीरित्याने पार पाडली.