राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची तालुका गणेश महासंघ मंडळाला भेट निर्जंतुकीकरण मोहिमेचे केले उदघाटन
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.12, सिल्लोड शहर व तालुका गणेश महासंघाच्या सराफा मार्केट येथील मंडळास महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवार ( दि.11) रोजी सायंकाळी भेट दिली. यावेळी सामाजिक उपक्रमांतर्गत नगर परिषद सिल्लोड व तालुका गणेश महासंघाच्या संयुक्त विद्यमाने शहरात निर्जंतुकीकरण मोहीम अंतर्गत धूर फवारणी व सेनेटायझर फवारणीचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.
यावेळी कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, गणेश महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, गणेश महासंघाचे पदाधिकारी राजेंद्र ठोंबरे, किशोर अग्रवाल, नरेंद्र ( बापू ) पाटील, सुदर्शन अग्रवाल, विशाल जाधव, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, प्रशांत क्षीरसागर, राजू गौर, शेख सलीम हुसेन, रतनकुमार डोभाळ, गौरव सहारे, डॉ. दत्ता भवर, राजू बन्सोड, अक्षय मगर, संजय मुरकुटे, रामसेट कटारिया, आत्माराम अग्रवाल, मधुकर बेंडाळे, अनिल काळे, कुणाल सहारे, दिलीप मगर, शैलेश झंवर, आनंद सिरसाट, देविदास घरमोडे, तुळशीराम कंकाळ आदींसह नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.