दि. 26 ऑगस्ट 2021 पासून मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने असंघटीत कामगारांसाठी श्रमिक लेबर कार्ड योजना सुरु केली आहे.
Summary
योजनेचे फायदे 1) असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल. 2) सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देईल. 3) सरकारला असंघटीत कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल, त्या धोरणांचा फायदा […]
योजनेचे फायदे
1) असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.
2) सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देईल.
3) सरकारला असंघटीत कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल, त्या धोरणांचा फायदा भविष्यात त्यांनाच होईल.
4) हे कार्ड तयार केल्यास असंघटीत कामगारांना सरकारकडून 1 वर्षांसाठी विमा मोफत दिल्या जाईल.
5) तसेच असंघटीत कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे.
*श्रमिक लेबर कार्ड कोण काढू शकत?*
1) लहान व सिमांत शेतकरी 2) शेतमजूर 3) सुतार 4) कुंभार 5) न्हावी 6) पशुपालन करतात ते 7) आशा कामगार 8) अंगणवाडी सेविका 9) रस्त्यावरचे विक्रेते 10) बांधकाम कामगार 11) दुध उत्पादक शेतकरी 12) न्हावी13) भाजी आणि फळ विक्रेते 14) ऑटो चालक 15) गवंडी 16) लोहार 17) सुरक्षाकर्मी 18) प्लंबर 19) इलेक्ट्रिशियन 20)मच्छीमार कामगार 21) बिडी भरणारे कामगार 22)चामडे शिवणारे व विकणारे कामगार, 23) मिठ बनवणारे व विकणारे कामगार, 23) वीट भट्टी व खोदकाम करणारे कामगार, 24)घर काम करणाऱ्या महिला, 25) वृत्तपत्र विकणारे कामगार, 26) रेशम कपडे शिवणारे कामगार, 27)घरात कामाला असणारी महिला/ पुरुष कामगार 28) दूध विक्री करणारे कामगार, 29) प्रवासी कामगार, 30) व सर्व इतर कामगार श्रमिक लेबर कार्ड काढू शकतात.
श्रमिक लेबर कार्ड कोण काढू शकत नाही?
1) संघटीत क्षेत्रातील खाजगी किंवा सार्वजनिक कामगार (ज्यांना नियमित पगार, वेतन आणि भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीच्या रुपात आणि सामाजिक सुरक्षा यासह इतर लाभ मिळतात.
2) आयकर भरणारा
3) EPFO आणि ESIC चे सदस्य
4) दिलेल्या असंघटीत श्रेणीमध्ये कार्यरत नसणारा
नोंदणीसाठी आवश्यक
1) आधार कार्ड
2) सक्रिय बॅंक खाते पासबुक
3) सक्रिय मोबाईल नंबर(आधार कार्डशी लिंक असलेला)
महत्वाची टीप:- श्रमिक लेबर कार्ड योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा श्रमिक लेबर कार्ड बनविण्यासाठी आपल्या गावातील – शहरातील कॉमन सर्व्हिस सेंटर (c.s.c.) केंद्र ज्यांच्या कडे आहे ते कुणीही आपले कार्ड तयार करून देऊ शकतात. तरी जास्तीत जास्त श्रमिकांनी आपली नोंदणी करून घ्यावी.
धन्यवाद…
भारतीय जनता पक्ष