BREAKING NEWS:
नागपुर

“राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य सेविकांवर कार्यमुक्तीची कुर्हाड ” कोंढाळी/काटोल:- प्रतिनीधी:-दुर्गाप्रसाद पांडे

Summary

कोंढाळी/काटोल:- प्रतिनीधी:-दुर्गाप्रसाद पांडे राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 597आरोग्य सेविकाना अतिरीक्त असल्याचे कारण देऊन केंद्र सरकार ने निधी न देता कार्यमुक्तीचे आदेश दिले.त्या अनषंगाने नागपुर जिल्ह्यात 23 कंत्राटी आरोग्य सेविका ना कामावरून कमी करण्यात आले आहे.या आरोग्य सेविका 15 वर्षा पासून […]

कोंढाळी/काटोल:- प्रतिनीधी:-दुर्गाप्रसाद पांडे

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 597आरोग्य सेविकाना अतिरीक्त असल्याचे कारण देऊन केंद्र सरकार ने निधी न देता कार्यमुक्तीचे आदेश दिले.त्या अनषंगाने नागपुर जिल्ह्यात 23 कंत्राटी आरोग्य सेविका ना कामावरून कमी करण्यात आले आहे.या आरोग्य सेविका 15 वर्षा पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करीत असुन त्यांना काहीही पुर्वसुचना न देता दिनांक 3/9/21 रोजी सायंकाळी 6वा कार्यमुक्त करण्यात आले.यात काही विधवा तर काही त्यांच्या कुटूंबाचा मुख्य उदर निर्वाह करणार्या आहेत.
यांना फक्त एक अट ठेवून काढण्यात आले.ती अट म्हणजे मागील वर्षात ज्यांच्या उपकेंद्रात एकही प्रसुती झाली नसल्याने त्याना कमी करणयात आले .
परंतू गेल्या 2020 पासुन संपूर्ण देशात पर्यायाने महाराष्ट्रात करोणा विषाणू ने थैमान घातल्याने परिस्थिती भयंकर झाली त्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य सेविकांनी घरदार, कुटूंब सोडून ,जिवावर उद्धार होवुन करोणा महामारीत प्रमुख भूमिका पार पाडली .त्यामध्ये कित्येक आरोग्य सेविका करोणा बाधित झाल्या,काहीच्या कुटूंबातील सदस्य मृत्यूमुखी पडले.यांच्या कार्याचा विचार न करता शासनाने त्याना सेवेतून कमी केले .एकीकडे करोणाच्या तिसर्या लाटेचे संकट येत असतांना व नागपुर येथील परिस्थिती गंभिर होत असतांना,आरोग्य सेवेचा प्रमुख भाग असणार्या आरोग्य सेविकांना सेवेतुन कमी करण्यात आले.
परंतु एक बाब लक्षात घेताना असे दिसले की,नागपुर जिल्हा परिषद अंतर्गत उमरेड तालुक्यातील प्राथ.आरोग्य केंद्र सिर्सी,येथील कंत्राटी आरोग्य सेविका यांच्या .उपकेद्राची लोकसंख्या 3442 असुन सन 19-20मध्ये एकुण 11व सन 20-21मध्ये एकुण 09 प्रसुती( डिलेवरी)कलेल्या आहेत.या सन 2011मध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल फ्लोरेन्स नाईटिंगेल जिल्हा स्तरीय पारितोषिक प्राप्त असून सुध्दा DPM यांनी कार्यमुक्त केले.
भिवापुर तालुक्यातील एकुण 5 कंत्राटी आरोग्य सेविका कमी करण्यात आले.त्यातील काही ठिकाणी ईमारत नाही .या पाचही कंत्राटी आरोग्य सेविका उपकेंद्रात एकट्याच कार्यरत होत्या.त्यांचेवर फारच अन्याय झाला आहे.जिल्ह्यातील बहुसंख्य कंत्राटी आरोग्य सेविका या उपकेंद्राच्या ठिकाणी नियमीत आरोग्य सेविका नसल्याने एकट्याच कार्यरत आहेत.
एकीकडे माणसाच्या मुलभूत गरजांमध्ये आरोग्य हे मुख्य गरज असतांना शासनाने राज्यातील 597 कंत्राटी आरोग्य सेविकाना सेवेतुन कमी केले.यावरून शासन जनतेच्या आरोग्याविषयी किती बेजबाबदार आहे हे दिसुन येते.
नागपुर जिल्ह्यात कंत्राटी आरोग्य सेविकांना सेवेतुन कमी करु नये.व जो पर्यत त्यांना सेवेत पुर्ववत घेत नाही तोपर्यंत राज्यस्तरीय कामबंद आंदोलनाचे निवेदन मां जिल्हाधिकारी साहेब, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब,मा.जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब जिल्हा परिषद नागपुर यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी/कर्मचारी समन्वय संघटनेच्या वतीने देण्यात आले.
यासाठी संघटनेच्या राज्य महासचिव कुंदाताई सहारे, नागपुर जिल्हा अध्यक्ष पौर्णिमा लांजेवार,उपाध्यक्ष माया रंगारी,सचिव यामिनी ठाकरे जिल्हा मुख्य समन्वयक सुनंदा साठे अर्चना विधाते छाया चौधरी ममता भोयर विना वासनिक माधुरी पाटील अर्चना राठोड मनिषा दोनाडकर सपना पानसोक मिना महाजन बेबी कामतवार जयश्री धाबर्डे हेमलता गजभिये तारा नायडू निशा कांबळे सरला परतेकी वासेकर ताई रूपाली तिडके ज्योती यादव वर्षा रोडे छाया शेंबरे छाया मेश्राम व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कंत्राटी आरोग्य सेविका यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *