कोरोना च्या पार्श्वभूमीवर पथनाट्याद्वारे जनजागरण…. .. आयुष्यमान हॉस्पिटल चा अनुभवातून उपक्रम…….
नागपूर जिल्हा वार्ता: सन ..2020 च्या मार्च महिन्यापासून कोरोना प्रकोपाने नागरिकांमध्ये कोरोना रोगाबद्दल दहशतीचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे आवश्यक वस्तूंना सोडून शहरातील व ग्रामीण भागातील बाजार चहाची दुकाने हॉटेल्स लहान सहान दुकान पूर्णपणे बंद झाली होती त्यामुळे इतर बेरोजगारी प्रमाणे या दुकानदारावर सुद्धा आली होती गेल्या सहा महिन्यापासून लोक डाऊन मुळे जनता त्रस्त झाली होती कोरोना हा जरी जीव घेना रोग असला तरी त्यावर सतर्कता व उपाय योजना नागरिकांनी केल्या पाहिजे याकरिता कामठी कळमना रोड वरील आयुष्यमान हॉस्पिटल चे डॉक्टर त्रीदीप गुहा व डॉ कमलेश शर्मा च्या पुढाकारातून व असर फाउंडेशन भंडारा यांच्या माध्यमातून कोरोना रोग मुक्तीसाठी पथनाट्याद्वारे कामठी शहर व कामठी ग्रामीण भागात जनजागरण करण्यात आले पथनाट्यातून कोरोना मुक्त परिवार कसे राहावे तसेच कशी स्वतःची सुरक्षा घ्यावी सामाजिक अंतर या विषयावर गीताद्वारे समाज प्रबोधन करण्यात आले यामध्ये विक्रम फडके वैभव कोलते दीपक तिघरे दामिनी येलोकर स्नेहा तिडके सय्यद अब्रार आदींनी विविध प्रकारे पथनाट्य सादर करून समाज प्रबोधन केले या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयुष्यमान हॉस्पिटलचे कर्मचारी प्रयत्नशील होते
✍🏼दिलीप भुयार
पश्चिम नागपूर प्रतिनिधी
9503309676