शिवाजीची प्राची शंकर कोठारे ही ओबीसी मधून संपूर्ण देशातून 32 व्या क्रमांकावर तर विदर्भातून अव्वल
गडचिरोली जिल्हा वार्ता : शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शि ची विद्यार्थिनी कु. प्राची शंकर कोठारे ही नीट परीक्षेत 720 पैकी 695 गुण प्राप्त करून, संपूर्ण भारतातून 156 व्या क्रमांकाने, ओबीसी प्रवर्गातून 32 व्या क्रमांकाने, तर विदर्भातून अव्वल आल्याबद्दल, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. अनिल पाटील म्हशाखेत्री यांच्या शुभहस्ते तिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव गोविंदराव बानबले, ज्येष्ठ सदस्य डी. एन. चापले , प्राचार्य हेमंत रामटेके, चामोर्शी शाखेचे उपप्राचार्य किरमे ,गडचिरोली उपप्राचार्य ताराम सर पर्यवेक्षक रामकृष्ण ताजने प्रा. राजेंद्र हिवरकर प्राची चे आई वडील श्री शंकर कोठारे व सौ कोठारे प्रा. गौरकर प्रा. शेट्टे, प्रा. नरुले, प्रवीण ब्राह्मणवाडे आदी उपस्थित होते
यावेळी आपल्या मनोगतातून कुमारी प्राची कोठारे हिने आपल्या यशाचे श्रेय शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शी चे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व आपल्या आई-वडिलांना दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री यांनी आपल्या मनोगतातून प्राची हिने नामांकित डॉक्टर बनवून आपल्या जिल्ह्याला सेवा प्रदान करण्याचा आशावाद व्यक्त केला.
विशेष म्हणजे प्राची चे मूळ गाव एटापल्ली असून, वडील चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहे. कार्यक्रमाचे संचालन पर्यवेक्षक रामकृष्ण ताजने तर आभार प्राध्यापक राजेंद्र हिवरकर यांनी मानले.
जिल्हा प्रतिनिधी,
प्रा. शेषराव येलेकर