BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची रामकृष्ण मठाला भेट

Summary

मुंबई, दि. 5 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खार, मुंबई येथील रामकृष्ण आश्रम व मठाला भेट दिली. मंत्रोचारात राज्यपालांचे स्वागत झाल्यावर राज्यपाल स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले. रामकृष्ण मिशनच्या कार्याचे कौतुक करताना राज्यपालांनी मिशनद्वारे चालविल्या जाणाऱ्या हॉस्पिटलला […]

मुंबई, दि. 5 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खार, मुंबई येथील रामकृष्ण आश्रम व मठाला भेट दिली. मंत्रोचारात राज्यपालांचे स्वागत झाल्यावर राज्यपाल स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले.

रामकृष्ण मिशनच्या कार्याचे कौतुक करताना राज्यपालांनी मिशनद्वारे चालविल्या जाणाऱ्या हॉस्पिटलला अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी तसेच मिशनच्या शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडविण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.

राज्यपालांनी त्यानंतर शारदा माता मंदिराला भेट दिली व उपस्थित साधुंशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांनी सत्संग भजन ऐकले व नामजपात सहभाग घेतला.

रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद यांनी राज्यपालांचे स्वागत करताना आश्रमातर्फे चालविल्या जाणाऱ्या सेवाकार्याची तसेच इस्पितळाची माहिती दिली.

मठाचे सहायक सचिव स्वामी अपरोक्षानंद, व्यवस्थापक स्वामी देवकांत्यानंद, स्वामी तन्नमानंद, रामकृष्ण मिशन हॉस्पिटलचे डॉ. स्वामी दयामुर्त्यानंद व इतर साधूगण यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *