तेजस संस्थे व्दारे तालुक्यातुन १२ वीत प्रथम धनश्री नायडु चा सत्कार
नागपूर वार्ता : – तेजस बहुउद्देशीय संस्था व तेजस प्रशिक्षण कामठी व्दारे कन्हान येथील कु धनश्री चंद्रकुमार नायडु या विद्यार्थीनी इयत्ता १२ वी च्या परिक्षेत पारशिवनी तालुक्यातुन प्रथम क्रमाकं पटकविल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला.
गुरूवार (दि.१५) ला शंकर नगर कांद्री येथे तेजस बहुउद्देशीय संस्था व प्रशिक्षण कामठी व्दारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार यांचे अध्यक्षेत प्रमुख अतिथी मार्गदर्शक, नगरसेवक महेंद्र भुटानी, जामुवंतराव धोटे विचार मंच अध्यक्ष सुनील चोखारे, विदर्भवादी नेते अरूण केदार, समाजभुषण रमेश महेरोलिया, ग्रामिण पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कन्हान उपाध्य क्ष कमलसिंह यादव, मार्गदर्शक रहीम शेख, ज्ञानविकास उच्च प्राथमिक शाळा नागपुर चे मुख्याध्यापक नरेंद्र खोब्रागडे, सदस्य मिस्बाहऊर रहमान आदीच्या उपस्थित श्रीनारायण विद्यालय कन्हान ची विद्यार्थीनी कु धनश्री चंद्रकुमार नायडु चा इयत्ता १२ वी वाणिज्य शाखेत मार्च २०२० मध्ये ९२.६१ % गुण प्राप्त करून पारशिवनी तालुक्यातुन प्रथम क्रमाकं प टकाविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह, प्रमाणप त्र देऊन मिठाई भरवुन तिचे आजोबा,आ ई, वडीलासह भव्य सत्कार करून अभि नंदनाचा वर्षाव करण्यात आला. कार्यक्र माचे सुत्रसंचालन तेजस संस्था प्रवक्ता व कविवर्य सुर्यभान शेंडे यांनी तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष देवीदास पेटारे हयानी व्यकत केले. सत्कार समारंभास नगरातील नागरिक उपस्थित होते.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535