भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात माहितीच्या अधिकाराची अवहेलना
Summary
प्रतिनिधी तुमसर:- प्राप्त माहिती नुसार एका सामाजिक कार्यकर्त्याने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात तुमसर चे माननीय आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या आमदार निधी वर माहिती मागितली होती. सदर अर्ज हा दिनांक 12-07-2021 रोजी भंडारा जिल्हा अधिकारी कार्यालयात करण्यात आला होता. प्रस्तुत अर्जामध्ये राजुभाऊ […]

प्रतिनिधी तुमसर:- प्राप्त माहिती नुसार एका सामाजिक कार्यकर्त्याने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात तुमसर चे माननीय आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या आमदार निधी वर माहिती मागितली होती. सदर अर्ज हा दिनांक 12-07-2021 रोजी भंडारा जिल्हा अधिकारी कार्यालयात करण्यात आला होता. प्रस्तुत अर्जामध्ये राजुभाऊ कारेमोरे यांच्या आमदार विकास निधिचा मंजूरी, विकासकामे, खर्च व नियमनाची माहिती मागितली गेली. त्यात सन 2019 ते आज तारखेपर्यंत आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या आमदार निधितुन कोणकोणती कामे पूर्ण झाली. कोणकोणती कामे चालू आहेत. कोणकोणति कामे प्रस्तावित आहेत. प्रत्येक विकासकामावर किती निधी खर्च झाला. खर्च झालेला वर्षनिहाय निधी तसेच न वापरलेला शिल्लक निधी किती आहे. या मुद्द्यावर माहिती सामाजिक कार्यकर्त्याने मागितली असता तीस दिवसांचा कालावधी होउनही माहिती संदर्भात पत्र प्राप्त झाले नाही. परंतु तरीही तीन दिवस कार्यकर्त्याने वाट बघितली म्हणजे 33 दिवसांचा कालावधी होउनही पत्र प्राप्त न झाल्याने अखेर त्या कार्यकर्त्याने दिनांक 15-08-2021 रोजी प्रथम अपील केले आहे.