गडचिरोली जिल्ह्यात 569 तपासण्यांपैकी 8 कोरोना बाधित तर 2 कोरोनामुक्त जिल्हयात 6 डेल्टा प्लस रूग्णांची नोंद
गडचिरोली दि.24 : आज गडचिरोली जिल्हयात 569 कोरोना तपासण्यांपैकी 08 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 02 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30689 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29915 व पोहचली.तसेच सद्या 28 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.48 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.09 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.
दर महा काही नमुने तपासणीसाठी पुणे येथील केंद्रीय प्रयोगशाळेत पाठविले जातात. यातील काल 6 नमुने कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लसचे आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये चामोर्शी तालुक्यात 3, गडचिरोली 1 व अहेरी तालुक्यात 2 रूग्ण आढळून आले आहेत. याबाबत आरोग्य विभागाने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. कोरोना बाबत दिलेल्या विविध आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी नागरिकांनी करावी असे आवाहनही विभागाने केले आहे.
नवीन 08 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 03, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 02, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 02, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 01, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 02 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 00, अहेरी 00, आरमोरी 00, भामरागड 00, चामोर्शी 02, धानोरा 00, एटापल्ली 00, मुलचेरा 00, सिरोंचा 00, कोरची 00, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी शेषराव येलेकर