चौदावी खर्चाची रक्कम दिली कोविड सेंटरला
स्वार्थी करमकर
तुमसर वार्ता: दुर्गा नगर येथील बाबुराव भाजीपले (वय८०)हे नगर परिषेदेमधून वरीष्ठ लिपिक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. प्रकृती बिघडल्याने त्यांचा २६ सप्टेंबअ र ला मृत्यु झाला.त्यांचा चौदावी ्चा कार्यक्रम ९ अॅक्टोबर रोजी होता. परंतु सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे .अशा परिस्थितीत सामाजिक परंपरेनुसार १४ विचा कार्यक्रम घेऊन गर्दी करणे सामाजिक आणि कोटुंबिक दुष्ट्रिकोनातून धोकादायक आहे.हे लक्षात घेता त्यांच्या मुलांनी २५ हजार रुपयांची मदत तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या कोविड केअर सेंटर ला दिली.
स्वार्थी करमकर
ग्रामीण महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर