भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

स्वयंमसेवक द्वारा नियोजित पोलिस स्टेशन तुमसर येथे चिमुकल्यांसोबत (विद्यार्थी) रक्षा बंधन कार्यक्रम तुमसर- खापा येथील शालेय विद्यार्थ्यांचा अनोखा राखी रक्षक उपक्रम

Summary

खापा – तुम्ही सर्वांनी कोविड महामारी मध्ये आमच्या सुरक्षेची काळजी घेतली. आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आम्ही तुम्हाला रक्षाबंधनाच्या संरक्षक धागा बांधत आहोत. आम्ही शाळेचे विद्यार्थी देवाकडे प्रार्थना करतो की त्याचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील. असे शालेय […]

खापा – तुम्ही सर्वांनी कोविड महामारी मध्ये आमच्या सुरक्षेची काळजी घेतली. आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आम्ही तुम्हाला रक्षाबंधनाच्या संरक्षक धागा बांधत आहोत. आम्ही शाळेचे विद्यार्थी देवाकडे प्रार्थना करतो की त्याचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील. असे शालेय विद्यार्थ्यांनी रक्षा सूत्र बांधताना व्यक्त केले. यावर पोलिस उपनिरीक्षक किरण अवताळे‌ भारावून गेले.

कोरोणा महामारी मध्ये समाजातील ज्या बांधवांनी देशाचे रक्षण केले. त्या बांधवांचा सन्मान तुमसर खापा येथील स्वयंमसेवक यांच्या शिकवनी वर्गातील चिमुकल्यांनी केला. पूर्ण देश लॉकडाऊन असताना समाजात फिरण्याची भीती असतानाही वैद्यकीय बांधव, पोलिस बांधव, अग्निशामक बांधव, वाहन नियंत्रण पोलिस बांधव आदी बांधव अहोरात्र नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी सदैव तत्पर होते.

समाजातील संस्कृती, रूढी, परंपरा, सण, उत्सव, यांची जपणूक मोफत शिकवणी वर्गामध्ये राखली जाते. विद्यार्थांना देशातील संस्कृतीची ओळख व्हावी, समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना निर्माण व्हावी याच उद्देशाने राखी रक्षक उपक्रमाचे आयोजन स्वयंमसेवक यांच्या द्वारा करण्यात आले.

तुमसर पोलिस स्टेशन मधील अधिकारी सहाय्यक पोलिस हेमंत पवार, पोलिस उपनिरीक्षक किरण अवताळे, संजय टेकाम, विलास करंगामी पोलिस नायक मंगेश गेडाम, सतीश ढेंगे, दिलीप मते पोलिस हवालदार चीचखेडे, पोलिस शिपाई गोविंद तांडेकर व तसेच मोफत शिकवणी वर्गातील स्वयंमसेवक अजय यादव, हिना राऊत व स्वार्थी करमकर आदी बांधवांचा चिमुकल्यांचा हातून राखी बांधून सन्मान करण्यात आला. चिमुकल्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना रक्षकांचे आशीर्वाद घेतले या बंधनामुळे अधिकारी आणि कर्मचारी भारावून गेले.

विविध क्षेत्रातील रक्षकांनी चिमुकल्या सोबत फोटो घेतले. रक्षाबंधन हे असे बंधन आहे जे मन आणि हृदयाला जोडते. तिलक लावल्यामुळे मनाला शीतलता प्राप्त होते, एकाग्रता वाढते, व्यक्तीमध्ये ऊर्जा संक्रमित करतो. औक्षण करीत असताना हलवणाऱ्या दिव्याच्या ज्योती संरक्षण करण्यासाठी वचनबध्द होतात. या ज्योती वाईट गोष्टी शोषून घेतात त्याचा नायनाट करतात असे रक्षाबंधन चे महत्त्व शिकवणी वर्गातील शिक्षक अजय यादव यांनी विद्यार्थांना सांगितले. मुली जन्मापासूनच सशक्त आहेत त्यांनी त्यांची शक्ती कमी करू नये असे प्रतिपादन पोलिस उपनिरीक्षक किरण अवताळे यांनी केले.

स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *