BREAKING NEWS:
हेडलाइन

तुमसर तालुक्यात रेती माफिया सक्रिय शासनाचा कोट्यावधिचा महसूल बुडित

Summary

तुमसर वार्ता : सर्वात जास्त रेती तस्करी ही तुमसर तालुक्यातून होत आहे. सध्या रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही तरीही सिहोरा परिसरातील वारपिंडकेपार येथे रेतीचा अवैध साठा असून या घाटातून रेतीची सर्रास ओवरलोड तस्करी सुरू आहे. याकडे तहसीलदारासह पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून […]

तुमसर वार्ता : सर्वात जास्त रेती तस्करी ही तुमसर तालुक्यातून होत आहे. सध्या रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही तरीही सिहोरा परिसरातील वारपिंडकेपार येथे रेतीचा अवैध साठा असून या घाटातून रेतीची सर्रास ओवरलोड तस्करी सुरू आहे. याकडे तहसीलदारासह पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून ते बघ्याच्या भूमिकेत आहेत. रेती माफियांच्या सोबत सेटिंग असल्यामुळे कोणीच अधिकारी कारवाई करीत नाही. रेती माफिया चे पोलीस व महसूल विभागासोबत मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याने कुठलीही कारवाई होत नसल्याची चर्चा परिसरात आहे. त्यामुळे एसडीओ ऑफिसमधून तहसील कार्यालयापर्यंत ची एका एका सेकंदाची माहिती रेती माफियांना पुरविली जाते. ही मोठी लॉबी असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. रेती माफिया च्या या वाहनांच्या वर्दळीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांवर रेती माती व धुळीचे थर बसत असल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दररोज जवळपास शंभर टक्के ओवरलोड रेतीची तस्करी होत असल्याने शासनाच्या करोडोंच्या महसूलास चूना लागत आहे.
तालुक्यातील सिहोरा परिसरातील सितेपार, तामसवाडी, पांजरा, रेंगेपार, सुकळी, देवडिदेव, बपेरा, मांडवी, धोंड्या, पिंडकेपार येथून रोज रात्रदिवस रेती तस्करी रेती जात आहे. सिहोरा परिसरातील प्रत्येक घाटावर तीच परिस्थिती आहे. दररोज जवळपास दोनशे ओव्हरलोड ट्रक प्रतिदिवस नागपूरला विकल्या जात आहे. त्यामुळे रोजच्या शासनाच्या जवळपास पंधरा लाखाचा महसूल लंपास होत आहे. यावर ठाणेदार व तहसीलदार काहीच कारवाई करीत नाही. केली तरी महसूल विभाग दोन चार ट्रॅक्टर व ट्रक वर थातूरमातूर कारवाई केली जाते. रेती माफियांशी साटेलोटे ठेवून पोलीस व महसूल विभाग मालामाल होत आहेत. रेती माफियांना प्रत्येक वाहनापोटीचा हप्ता ठरविला गेला आहे. ट्रॅक्टर करिता 5000 रुपये तर ट्रक करिता मनमानी हप्ता रेती माफिया देत असल्याची चर्चा आहे. यामुळे रेती माफियांना रान मोकळे आहे.
महसूलसह प्रत्येक कार्यालयात सेटिंग असल्याने कुठल्याही हालचालीची क्षणात माहिती मिळते. कुणी अधिकारी कार्यवाही करायला गेले यापुर्विच लावलेल्या फ़ील्डिंगमुळे माहिती एकमेकास पोहोचवली जाते. यामुळे घाटावर कोणीच दिसत नाही. मात्र निरन्तर होणारी रेती चोरी थांबत नाही. यात पोलिस व महसूल विभागाचे लोकही गुंतले आहेत. याशिवाय हे शक्य नाही. ही बाब सर्वांनाच माहित आहे. रक्षकच आज भक्षक बनले आहेत. रेती तस्करीत स्थानिकच नव्हे तर बाहेर गावच्याही वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
रेती माफियांना राजकीय मण्डळीचे वरदहस्त असतेच.
नदीत सर्रास जेसीबीने व पोकलँड मशीन लावून रेतीची अवैध रेतीचा उपसा सुरू आहे. नदीत जेसीबीने उत्खनन होत असतानाही ठाणेदार व तहसीलदार या प्रकारापासून अनभिज्ञ कसे असा प्रश्न पडतो. रेती माफियांना पोलीस व महसूल विभागाला हाताशी धरून दररोज लाखोंची उलाढाल करून शासनाच्या हातावर तुरी ठेवण्याचे काम करीत आहे. यात बीट जमादार मंडळ अधिकारी व पटवारी हेही तस्करांना मदत करतात. तेथे माफियांची सुसज्ज लावलेली फिल्डिंग नेहमीच काम करते.
परिस्थिती बघता परिसरातील नागरिक त्रस्त वघाबरलेले आहेत. यात शेतकऱ्यांची अवस्था सांगू नका. आधीच पाण्यासाठी बेजार झालेला शेतकरी कुठून तरी पाणी आणून इंजिनद्वारे शेताला पाणी देत आहे. अख्खी रात्र जागून काढत आहे. मात्र रेतिचा रात्रंदिवस उपसा करणार्‍या वाहनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कधी कुठले वाहन अंगावर येईल याचा बेत नाही. शिवाय सतत वाहनांच्या वर्दळीमुळे पिकांवर माती व धुळीचा थर बसलेला आहे. वाहनांनी धुरे तोडले आहे. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे रेती माफियांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे.
अमर वासनिक
न्यूज एडिटर
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
7774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *