लायन्स क्लब गडचिरोली तर्फे विश्वसेवा सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा
गडचिरोली वार्ता :
लायन्स क्लब इंटरनॅशनल ही संघटना जागतिक स्तरावर 2 ते 8 ऑक्टोंबर हा सप्ताह विश्वसेवा सप्ताह म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरा करीत असते.
लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने सुद्धा हा विश्वसेवा सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा केला. दि. 2 ऑक्टोंबर ला चित्रकला स्पर्धेचे बक्षीस आणि पी पी ई किटचे वितरण करण्यात आले. दि. 3 ऑक्टोंबर ला सेमाना मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दि. 4 ऑक्टोंबर ला गरजूंना वस्त्र दान करून एका गरजू पेशंटच्या ऑपरेशन साठी क्लब सचिव लॉ सतीश पवार यांचेकडून रुपये 25 हजाराची मदत करण्यात आली. दिनांक 5 ऑक्टोंबर ला चांदाळा व बोदली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पी पी ई किटचे वाटप करण्यात आले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र चांदाळाला एक पंखा भेट देण्यात आला. दि. 6 ऑक्टोबरला पातरगोटा व नवेगाव मधील गावकऱ्यांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले तसेच लहान मुलांना ड्रॉइंगवही व कलरपेटीचे वाटप करण्यात आले. दि. 7 ऑक्टोबरला नवेगाव व जांभळी येथे लहान मुलांना व नागरिकांना बिस्किट व फळवाटप करण्यात आले. 8 ऑक्टोंबर ला चांदाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. कारेवार यांचा गरोदर महिलांसाठी covid-19 चे मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या विविध कार्यक्रमासाठी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष प्रा. संध्या येलेकर सचिव सतीश पवार कोषाध्यक्ष मंजुषा मोरे लॉ मदत जीवानी, लॉ सुरेश लडके, लॉ शेषराव येलेकर, लॉ महेश बोरावार ,लॉ देवानंद कामडी, लॉ स्मिता लडके आदींनी आपला महत्त्वपूर्ण सहयोग नोंदविला.
–।———————————-
प्रा. शेषराव येलेकर
जिल्हा प्रतिनिधी