एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
Summary
नाशिक दि. 2 : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यानुसार एकलव्य मॉडेल निवासी शाळेत शासकीय, अनुदानित आणि खाजगी शिक्षण संस्थांमधून शिकत असणाऱ्या अनुसूचित/आदिम जमातीच्या इयत्ता 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी 31 ऑगस्ट […]
नाशिक दि. 2 : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यानुसार एकलव्य मॉडेल निवासी शाळेत शासकीय, अनुदानित आणि खाजगी शिक्षण संस्थांमधून शिकत असणाऱ्या अनुसूचित/आदिम जमातीच्या इयत्ता 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील नाशिक विभागांतर्गत 17, ठाणे विभागांतर्गत 08, अमरावती विभागात 04 आणि नागपूर विभागांतर्गत 10 अशा एकूण 39 एकलव्य मॉडेल निवासी शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या निवासी शाळेत इयत्ता 6 वी मध्ये नियमित प्रवेश घेण्यासाठी आणि इयत्ता 7 वी ते 9 वी च्या वर्गातील अनुसूचित जमातीच्या रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक अथवा मुख्याध्यापक यांनी https://admission.
शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या तसेच इतर शासनमान्य अथवा खाजगी, अनुदानित शाळेत शिकत असणारा कोणताही अनुसूचित जमातीचा विद्यार्थी हे आवेदनपत्र भरू शकेल. तसेच इयत्ता 6 वी मध्ये प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आणि आदिमकरिता प्रत्येक शाळेत 5 जागा आरक्षित असणार आहेत. ऑनलाईन प्राप्त आवेदनपत्रातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार आणि पालकांच्या मूळ राहिवासचा पत्ता विचारात घेऊन नजिकच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेत उपलब्ध जागेनुसार प्रवेश देण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प कार्यालये यांच्याशी संपर्क साधण्यात यावा, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.