शेतकरी आंदोलनाच्या वेळी आजी व माजी आमदार यांच्यात जुंपली
Summary
पुणे सागर घोडके मावळ – राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि भाजपाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी मधिल चौथ्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्याबाबत रास्ता रोको आंदोलन केल होत. या आंदोलनात विद्यमान […]
पुणे
सागर घोडके
मावळ – राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि भाजपाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी मधिल चौथ्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्याबाबत रास्ता रोको आंदोलन केल होत. या आंदोलनात विद्यमान आमदार व मा. राज्यमंत्री उपस्थित होते.
तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक ४ कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे व शेतकऱ्यांच्या सातबारावर टाखलेला ३२ (२) चे शिक्के काढण्यासाठी तळेगाव एमआयडीसी मधिल शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आमदार व राज्यमंत्री सहभागी झाले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकावर टिप्पणी केल्यामुळे दोघांत बाचाबाची झाली. काही वेळाने दोघेही तेथुन निघून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये आश्चर्याच वातावरण तयार झाले होते.