कान्द्री हनुमान मंदिर देवस्थान येथे हिंदु गौरव दिवस थाटात साजरा
संजय निंबाळकर/उपसंपादक
कन्हान : – कान्द्री हनुमान मंदिर देवस्थान येथे हिंदु गौरव दिवसा निमित्त भजन मंडळा द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करून श्रीराम प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली, भजन कीर्तन , मान्यवरांचे स्वागत करून व प्रसाद वितरण करित हिंदु गौरव दिवस थाटात साजरा करण्यात आला.
मागील वर्षी ५ ऑगस्ट २०२० ला श्रीराम मंदीर बांधकामचे भुमिपुजन अयोध्या नगरीत देशाचे पंतप्रधा न श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या भुमिपुजन सोहळाल्या एक वर्ष पुर्ण झाल्याने कांन्द्री येथे हनुमान मंदिर देवस्थान येथे भजन मंडळा व्दारे सायंकाळी ७ वाजता श्रीराम प्रतिमेचे पुजन कान्द्री ग्राम पंचायत चे सदस्य शिवाजी चकोले व महेंन्द्रबाबु पलिये यांच्या हस्ते करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हनुमान भजन मंडळ कान्द्री द्वारे भजन कीर्तन, श्रीराम जय राम जय जय राम च्या जयघोष करित जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी कन्हान ग्रामीण पत्र कार संघाचे सक्रिय सदस्य ऋृषभ बावनकर, मधुकर कामडे, विक्रम वांढरे, प्रेमदास आकरे, शिवाजी चकोले , महेंन्द्र बाबु पलिये यांचे शाल श्रीफल देऊन स्वागत करण्यात आले व परिसरात प्रसाद वाटप करून हिंदु गौरव दिवस थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्र माच्या यशस्विते करिता वामन देशमुख, वासुदेव आकरे, शैलेश हिंगे, एकनाथ सरोदे, विठ्ठल पुंड, फुलचंद हेडाऊ सह ग्रामस्थानी सहकार्य केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535