धर्मराज विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कन्हान : – धर्मराज विद्यालय व जुनियर कॉलेज कान्द्री-कन्हान येथे बारावी (एच एस एस सी ) मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गणगौरव व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कॉलेजच्या प्राचार्या पमीता वासनिक यानी भुषविले, प्रमुख अतिथी उपमुख्यध्यपक रमेश साखरकर, पर्यवेक्षक सुरेंद्र मेश्राम यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या. यात कु सिद्धी लोखंडे ( ९३.१७%), मोनीका गजभिये (९२.८३%), साक्षी नागपुरे (९२%), अदिती यादव ( ८९.६७%). गुण घेऊन प्राविण्य प्राप्त केले. कॉलेजचा निकाल १००% लागला असुन एकूण ८० विद्यार्थ्यांपैकी ७१ विद्यार्थी प्राविण्य प्राप्त व प्रथम श्रेणीत ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अनिल सारवे यांनी तर आभार सुरेंद्र मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी शिवचरन फंदे, सचिन गेडाम, योगीता गेडाम, विजय पारधी, हरीश पोटभरे, हरीश केवटे, सुनिल लाडेकर, अनिल मंगर, उदय भस्मे, दिपक बनकर, प्रकाश डुकरे, रजुसिँग राठोड, धर्मेंद्र रामटेके, अनिरुद्ध जोशी, संतोष गोन्नाडे, विद्या बालमवार, मनीषा डुकरे सह मोठ्या संख्येत शिक्षक बंधु-भगिनी उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क