संघ ते संसद बाइक रैलीचे कन्हान ला भव्य स्वागत कांग्रेस पदाधिका-यांचे केंन्द्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने.
कन्हान : – केंद्र सरकार चे जासुसी कांड, पेट्रोल-डीज़ल, राशन, गँस महागाई व बेरोजगारी च्या विरोधा त युवक कांग्रेस तर्फे संघ ते संसद पर्यंत बाइक रैलीचे आयोजन करण्यात आले असुन या बाईक रैलीचे कन्हान येथे युवक काॅंग्रेस च्या पदाधिका-यानी भव्य स्वागत करून केंन्द्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने करून महंगाई दरवाढ कमी करण्याची मागणी करण्या त आली.
रविवार (दि.१) ऑगस्ट २०२१ ला संघ ते संसद पर्यंत युवक काॅंग्रेस च्या पदाधिका-यांनी युवा नेता बंटी शेळके यांच्या नेतृत्वात भव्य बाईक रैली काढण्यात आली. ही बाईक रैली कन्हान ला दाखल होताच कन्हा न युवक काॅंग्रेस च्या पदाधिका-यांनी आंबेडकर चौक येथे ढोल ताश्याच्या गजरात बंटी शेळके यांना पुष्पहार घालवुन या बाईक रैलीचे भव्य स्वागत करण्यात आले असुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच केंन्द्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करून महागाई दरवाढ कमी करण्याची मागणी कर ण्यात आली. याप्रसंगी नागपुर जिल्हा ग्रामीण कांग्रेस उपाध्यक्ष नरेश बर्वे, नागपुर जिल्हा युवक कांग्रेस अध्य क्ष राहुल सीरिया, महासचिव आकिब सिद्दीकी, कन्हान शहर अध्यक्ष राजा यादव, कांद्री उपसरपंच बबलु बर्वे, नगरसेवक योगेश रंगारी, नगरसेविका रेखा टोहने, अमोल प्रसाद, राजा संभोजी, सदरे ऑलम, शक्ति सिंह , रोहित बर्वे, कुशल पोटभरे, निखिल तांडेकर, हसन शेख, सुरज कटौते, आनंद मेश्राम, अजय कापसीकर, गगन शेंडे, मंथन, शोएल, अनक शेख, आकाश राहिले, चंदन मेश्राम, प्रदीप बावने सह कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क