कांद्री येथे स्वच्छता पंधरवाडा ची सुरूवात
कन्हान : – नेहरू युवा केंद्र, विर शिवाजी क्रिडा मंडळ व ग्राम पंचायत कांद्री यांच्या सयुक्त विद्यमाने कांद्री गावात स्वच्छता पंधरवाडाची सुरूवात करून १ ते १५ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाने स्वच्छ गाव मोहीम राबवुन जनजागृती व श्रमदान करून स्वच्छता पंधरवा डा राबवुन “स्वच्छ गाव, सुंदर गाव करण्यात येईल.
रविवार (दि.१) ऑगस्ट २०२१ ला कांद्री येथे युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार संलग्न नेहरू युवा केन्द्र, विर शिवाजी क्रिडा मंडळ कांद्री व ग्राम पंचायत कांद्री यांच्या सयुक्त विद्यमाने कांद्री गावात “स्वच्छ गाव” ची शपथ घेऊन (दि.१ ते १५)ऑगस्ट स्वच्छता पंधरवाडा ची सुरूवात करण्यात आली. सोमवार (दि.२) ऑगस्ट ला गाव स्वच्छता अभियान राबवुन गाव स्वच्छ करण्यात आले. (दि.३ ते ६ ) ला स्वच्छता जनजागृती रैलीने जन संपर्क, (दि. ७ ते १०) ला निबंध स्पर्धा, (दि.११ ते १४) सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवुन रविवार (दि.१५) ऑगस्ट ला स्वातंत्र दिन साजरा करून स्वच्छता पंधरवाडा ची सांगता करण्यात येईल. या अभियाना च्या यशस्वितेकरिता नेहरू युवा केंद्र, विर शिवाजी क्रिडा मंडळ कांद्रीचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्राम पंचायत कांद्री पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी सहका र्य करित आहे. कांद्री “स्वच्छ गाव, सुंदर गाव” करण्या करिता गावातील मान्यवर मंडळी, सर्व ग्रामस्थ नागरि कांनी सहकार्य करावे असे आवाहन स्वच्छता अभिया न प्रमुख व विशेष कार्यकारी दंडाधिकारी श्याम मस्के यानी केले आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क