महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांना आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
Summary
मुंबई, दि.26 : महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निधनाबद्दल आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या शोकसंदेशात मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणतात,महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष, रायगड जिल्हा अध्यक्ष, महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार श्री. माणिकराव […]
मुंबई, दि.26 : महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निधनाबद्दल आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
आपल्या शोकसंदेशात मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणतात,महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष, रायगड जिल्हा अध्यक्ष, महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार श्री. माणिकराव जगताप यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. काँग्रेस पक्षाने कर्तृत्वान व उमदे नेतृत्व गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली, संपूर्ण जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही प्रार्थना.
