पुरग्रसितांना चरण वाघमारेंचा दिलासा
Summary
तालुका प्रतिनिधि/तुमसर मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि बावनथडी प्रकल्प धोक्याच्या पातळीवर जात असल्याने, या प्रकल्पातुन सोडलेल्या पाण्याने भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना हैराण केले. राज्य शासनाचे जिल्ह्यातील पूर परिस्थिती चा न घेतलेला आढावा इथे नुकसानीस कारणीभूत ठरला.समन्वय नसणे, परिस्थिती हाताळण्याचे कुवत नसणे यामुळे […]
तालुका प्रतिनिधि/तुमसर
मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि बावनथडी प्रकल्प धोक्याच्या पातळीवर जात असल्याने, या प्रकल्पातुन सोडलेल्या पाण्याने भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना हैराण केले. राज्य शासनाचे जिल्ह्यातील पूर परिस्थिती चा न घेतलेला आढावा इथे नुकसानीस कारणीभूत ठरला.समन्वय नसणे, परिस्थिती हाताळण्याचे कुवत नसणे यामुळे जिल्ह्यावसीयांचे अतोनात नुकसान झाल्याचे काल प्रत्यक्ष पूरग्रस्तांना भेट दिल्यावर दिसून आले.नियोजनाअभावी काय नुकसान होते हे परवा पासून सर्वत्र दिसून आले.आतातरी शेतकऱ्यांना,नागरिकांना त्यांच्या पूर्ण नुकसानीचे पंचनामे करून, काही ठिकाणी सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा जनसामान्यांचे नुकसान करणाऱ्या सरकार विरोधात जनआंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, विकास फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा,माजी आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले.