BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

वरळी परिसरातील विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

Summary

मुंबई, दि. २२ : वरळी परिसरात सध्याचा वांद्रे-वरळी सी-लिंक आणि भविष्यात उभारले जाणारे कोस्टल रोड, वरळी-शिवडी जोड रस्ता या प्रकल्पांमुळे रहदारी वाढेल. या पार्श्वभूमीवर येथील रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य […]

मुंबई, दि. २२ : वरळी परिसरात सध्याचा वांद्रे-वरळी सी-लिंक आणि भविष्यात उभारले जाणारे कोस्टल रोड, वरळी-शिवडी जोड रस्ता या प्रकल्पांमुळे रहदारी वाढेल. या पार्श्वभूमीवर येथील रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

श्री. ठाकरे यांनी वरळी येथे सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विविध विकास कामांचा आढावा घेतला. या कामांमध्ये रस्ते, मैदाने, रेल्वे पुलाला पूरक रस्ता, किल्ला परिसर, पदपथ, जिम, स्वच्छतागृहे आदींचा समावेश आहे.

यावेळी आमदार सदा सरवणकर, प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर, माजी मंत्री सचिन अहिर, महापालिकेचे उपायुक्त (पायाभूत सुविधा) राजन तळकर, जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *