कारगिल विजय दिवसी शहिदांना श्रद्धांजली
कन्हान : – शहर विकास मंच द्वारे २६ जुलै कारगिल विजय दिवसा निमित्य शहिद चौक तारसा रोड कन्हान येथील शहिद स्मारकावर पुष्पहार, माल्यार्पण करून पुष्प अर्पित करित दोन मिनटाचे मौन धारण करून शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कारगिल विजय दिवस हा स्वतंत्र सर्व भारतवासी यांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असुन हा दिवस भार तात दरवर्षी २६ जुलै रोजी साजरा केला जातो. इसवि सन २६ जुलै १९९९ वर्षी भारत आणि पाकिस्तानच्या जवांन मध्ये कारगिल युद्ध झाले होते. युद्ध ६० दिवस चालले असुन २ जुलै ला युद्ध संपले होते आणि त्यात भारताने विजय मिळवला असुन आपले पाचशेच्या वर जवान शहीद झाले. कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांचा सन्मानार्थ कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यांनी कारगिल विजय दिवसा निमि त्य शहिद चौक कन्हान येथे मंच उपाध्यक्ष संजय रंगारी च्या उपस्थितीत शहिद स्मारकावर पुष्पहार, माल्यार्पण करून व पुष्प अर्पित करित दोन मिनटाचे मौन धारण करून युद्धांत शहिद झालेल्या वीर जवानां ना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष संजय रंगारी, सचिव प्रदीप बावणे, हरीओम प्रकाश नारायण, ऋृषभ बावनकर, प्रकाश कुर्वे, सोनु खोब्रागडे, सुषमा मस्के, वैशाली खंडार, अखिलेश मेश्राम, चिंटु वाकुडकर, मयुर माटे, सचिन वासनिक सह मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535
