रेड क्रॉस सोसायटी व टिळकनगर उद्योग समूहाच्यावतीने ऑक्सिजन वनराई वृक्षारोपण करताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे,उपअधीक्षक संदीप मिटके,जनरल मॅनेजर श्री सि आर रमेश,व्यवस्थापक डी एस मोरे,व्यवस्थापक केशव धायगुडे ,हरीश मोरे दिसत आहेत
Summary
रेड क्रॉसच्या ऑक्सिजन वनराई प्रकल्पास टिळकनगर मध्ये प्रारंभ श्रीरामपूर- इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा श्रीरामपूर व टिळकनगर उद्योग समूह यांचे संयुक्त विद्यमाने रेड क्रॉसच्या ऑक्सिजन वनराई प्रकल्पाचा प्रारंभ टिळकनगर परिसरात अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप […]

रेड क्रॉसच्या ऑक्सिजन वनराई
प्रकल्पास टिळकनगर मध्ये प्रारंभ
श्रीरामपूर- इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा श्रीरामपूर व टिळकनगर उद्योग समूह यांचे संयुक्त विद्यमाने रेड क्रॉसच्या ऑक्सिजन वनराई प्रकल्पाचा प्रारंभ टिळकनगर परिसरात अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे शुभहस्ते करण्यात आले
प्रमुख अतिथी म्हणून टिळकनगर उद्योग समूहाचे जनरल मॅनेजर श्री सि आर रमेश,व्यवसथापक श्री डी एस मोरे,व्यवस्थापक श्री केशव
धायगुडे,शेती अधिकारी हरीश मोरे,विभाग प्रमुख संगिता शिरसाठ आदी मान्यवर उपस्तीत होते
रेड क्रॉसचे सचिव सुनील साळवे यांनी सांगितले,कोरोनाच्या महामारीमध्ये ऑक्सिजन अभावी अनेकांचे प्राण गेले त्यामुळे आपण प्रत्येकाने परिसरामध्ये जादा ऑक्सिजन देणारे झाडे लावावीत या हेतूने रेड क्रॉसने ऑक्सिजन वनराईचा प्रकल्प हाती घेतला असून जिल्यातील गरज असणाऱ्या ठिकाणीही ऑक्सयजन झाडीच लावली जाणार असल्याचे सुनील साळवे यांनी प्रस्तविकात सांगितले
यावेळी मान्यवरांच्याहस्ते वड, पिंपळ,निंब,आरेकपम,कांचन,रेन ट्री, तुलसी,बटूल,आदी वृक्षांचे रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
रेड क्रॉस सोसायटी व टिळकनगर उद्योगसमूहाकडून अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचा सन्मान करण्यात आला
व्यवस्थापक श्री केशव धायगुडे यांनी उपस्तितांचे आभार मानले
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सुनील साळवे,प्रमोद पत्की,प्रवीण साळवे,राजेंद्र केदारी,सुरंजन साळवे,चंद्रकांत परदेशी,ऍड पराग कारखानीस,बाळासाहेब पाटोळे,श्रावण भोसले,महेंद्र कालांगे,साहेबराव रकटे, प्रेमनाथ सोनुने,सागर गिरणारे,किरण सोनवणे,सोमनाथ परदेशी,सुदर्शन निकाळजे, शोभा शेंडगे,सविता साळुंके,पुष्पा शिंदे,बिना बोर्डे आदींसह टिळकनगर उद्योग समूहाने विशेष परिश्रम घेतले