मनपाच्या रुग्णवाहिकेला कुत्रे पकडणाऱ्या वाहनाचा आधार
Summary
चंद्रपूर शहर महानगर पालिकेने शहरातील रुग्णांना रुग्णालयापर्यंत जाणे सोयीचे व्हावे यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, इंधन संपल्याने रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेला मोकाट कुत्रे पकडणाऱ्या वाहनाचा आधार घ्यावा लागला. हा प्रकार शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 4 येथे बघायला […]
चंद्रपूर शहर महानगर पालिकेने शहरातील रुग्णांना रुग्णालयापर्यंत जाणे सोयीचे व्हावे यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, इंधन संपल्याने रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेला मोकाट कुत्रे पकडणाऱ्या वाहनाचा आधार घ्यावा लागला. हा प्रकार शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 4 येथे बघायला मिळाला. अत्यावश्यक सेवेतील वाहनात इंधन नसणे, ही मोठी शोकांतिका आहे. काही दिवसांपूर्वी इंधन संपल्याने पाण्याची टँकर भर रस्त्यात उभी करण्याची वेळ संबंधित चालकांवर आली होती. या सर्व प्रकारामुळे मनपातील सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा समोर येत आहे. रस्ते, उद्यान, बगीचे बांधणे हाच येथील सत्ताधाऱ्यांचा विकास असल्याचा अनुभव चंद्रपूरकरांना आला आहे. त्यामुळेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पेट्रोल, डिझेल न देणे, या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
