टेकाडी शेतशिवारात विज पडुन तीन बक-याचा मुत्यु व्यकटराव संतापे जख्मी.
कन्हान : – परिसरात दुपार नंतर आलेल्या वादळ वारा पाऊसा येऊन टेकाडी शेत शिवारात विज पडुन निंबा च्या झाडाखाली आढोश्याला असलेल्या तीन बक-या घटनास्थळी मुत्यु पावल्या तर त्यांना चाराई करणारा व्यरंटराव संतापे गंभीर जख्मी झाल्याने नागपुर ला शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
रविवार (दि.१८) ला दुपारी कन्हान परिसरात वादळ वा-यासह पाऊस आल्याने दुपारी ३ वाजता दरम्यान टेकाडी शेतशिवारात नहरा जवळ असलेल्या निंबाच्या झाडाखाली पाऊसापासुन बचाव करण्या करिता आढोश्याला व्यकंटराव संतापे व बक-या उभ्या होत्या तर दुस-या झाडाखाली महादेव हुड व बक-या होत्या. परंतु निंबाच्या झाडावर विज पडल्याने तीन बक-या चा घटनास्थळी मुत्यु झाला तर व्यंकटराव संतापे जख्मी झाल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे आणले असता गंभीर जख्मी असल्याने डॉक्टरांनी मेयो शासकीय रूग्णालय नागपुर ला उपचारार्थ पाठविण्यात आले आहे.
टेकाडी पोलीस पाटील यांच्या माहीतीनुसार गावा तील महादेव हुड व व्यकंटराव संतापे हे बक-या पाळ त असुन दोघेही आपआपल्या बक-या टेकाडी शेत शिवारात नेहमी चारत असतात. आज चराई करताना वादळ वारा पाऊस आल्याने दोघेही वेगवेगळ्या झाडा खाली उभे असताना निंबाच्या झाडावर विज पडुन तेथे असलेल्या महादेव हुड यांच्या तीन बक-या घटना स्थळीच मुत्यु पावल्या तर व्यंकटराव संतापे हे जख्मी झाले. घटनेची माहीती मिळताच पोलीस पाटील पुंडलिक कुरडकर व पटवारी भोसले घटनास्थळी पोहचुन पुढील कार्यवाही केली.
संजय निम्बाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535