BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महापारेषणकडून १ कोटी ४२ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९

Summary

मुंबई, दि. 13: मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी महापारेषणकडून 1 कोटी 42 लाख 43 हजार 411 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुपुर्द केला. मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी हा धनादेश सुपुर्द करण्यात आले. यावेळी मुख्य […]

मुंबई, दि. 13: मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी महापारेषणकडून 1 कोटी 42 लाख 43 हजार 411 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुपुर्द केला.

मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी हा धनादेश सुपुर्द करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महापारेषणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची या योगदानाबद्दल प्रशंसा केली आहे. कोविड-19 च्या संकटात हे सर्व अधिकारी, कर्मचारी वीज वहन अखंडीत रहावा यासाठी आणि कोकण किनारपट्टीत आलेल्या निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळासारख्या आव्हानात्मक परिस्थितीतही सदैव सज्ज राहिले आहेत. यातूनही त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याची संवेदनशीलता दाखविली आहे, जी कौतुकास्पद आहे.

यात महापारेषणच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या एक दिवसाच्या वेतनातून हे योगदान धनादेशाच्या रुपात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19

मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

 

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch,

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

 

मराठीत-

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19

बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि. 13.7.2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *