▪ आधी—–केलेच पाहिजे▪ ▪ केल्याने होत आहे रे—–▪ ▪ आमदार दादारावजी केचे यांनी दिली हिरवी झेंडी आर वी टी पॉइंटला मिळणार वसंतरावजी नाईक चौक नाव▪ ▪ हाबूजी उर्फ वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त गोर सेनेचा स्तुत्य उपक्रम▪
Summary
▪ पोलीस युद्धा वृत्त सेवा▪ महाराष्ट्राचे शिल्पकार कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक शेतकऱ्यांचे कैवारी आणि दीनदुबळ्या चे प्रणेते आधुनिक महाराष्ट्राला पहिल्यांदा शेतकऱ्याला सन्मानाने जगता यावे यासाठी राबणाऱ्या कष्टकरी समाजाला नायक साहेबांच्या सन्मानार्थ ऐतिहासिक असे आजवर काहीही घडून आले नाही नायक साहेब […]
▪ पोलीस युद्धा वृत्त सेवा▪
महाराष्ट्राचे शिल्पकार कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक शेतकऱ्यांचे कैवारी आणि दीनदुबळ्या चे प्रणेते आधुनिक महाराष्ट्राला पहिल्यांदा शेतकऱ्याला सन्मानाने जगता यावे यासाठी राबणाऱ्या कष्टकरी समाजाला नायक साहेबांच्या सन्मानार्थ ऐतिहासिक असे आजवर काहीही घडून आले नाही नायक साहेब जन्मशताब्दी दिनानिमित्त बहुतांश बाबी अजूनही अपूर्ण आहे . संपूर्ण भारताचा पोशिंदा हा शेतकरी व कष्टकरी समाज आहे तो जगला तर सर्व जगेल नाहीतर सर्वांचे मरण अटळ आहे म्हणूनच वसंतरावजी नाईक यांनी प्रथमता शेती व शेतकरी आणि कष्टकरी समाजाला काय दुःख होते हे समजून घेऊन त्यांच्याप्रती आपल्याला काय ? करता येईल याविषयीचे सतत चिंतित असायचे .कोरडवाहू शेतीला कसे सिंचनाच्या खाली आणता येईल या विषयी त्यांनी छोटे छोटे तलाव व पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेचा आधार घेऊन शेती पर्यंत पाणी कसे पोहोचवता येईल त्याविषयी नियोजन करून त्यांनी कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचविले आणि शेतकऱ्यांचे दुःख जाणून त्यांना योग्य त्या उपाययोजना करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटविले म्हणूनच त्यांना हरितक्रांतीचे प्रणेते म्हणतात.
शेती विकास झाल्याशिवाय देशाला अन्नधान्याची स्वयंपूर्णता होणार नाही व तसे घडले नाही तर वाढत्या लोकसंख्येची भूक भागविणे अशक्य होईल . आपल्या देशातील दारिद्र्य आणि धान्याची टंचाई याविरुद्ध लढा देण्याची गुरुकिल्ली ही शेतीच आहे. हे त्यांना माहीत होते शेतीचे उत्पन्न ज्या पद्धतीने वाढवता येईल तेवढे वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
प्रगतीचा मूळ पाया या देशातील शेतीमध्ये आहे या देशाची प्रगती मोजण्याची मोजपट्टी म्हणजे शेतीची प्रगती होय माझ्याजवळ असलेली बुद्धी शक्ती अधिकार या नात्याने मी कशा तऱ्हेने वापरून जनतेची सेवा करू शकतो याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे कारण आपण सर्व जबाबदार लोक आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवून प्रगतीच्या प्रत्येक कामात आपण स्वतः पुढाकार घेतला पाहिजे माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू आहे असे त्यांचे मत होते. आम्ही जर आपसात भांडू लागलो ? एकमेकांना मारू लागलो तर आपली शक्ती त्यातच खर्ची पडेल यासाठी जातीय सलोखा राखणे फार आवश्यक आहे . देश आणि भारतीय समाज बलवान करायचा असेल तर धर्म ,वंश ,पंथ, जात ,भाषा यावर आधारलेले भेद नष्ट झाले पाहिजे. हा देश आपला आहे. देशाचा आणि राज्याचा विकास बाहेरून येऊन कोणी करणार नसून आपल्यालाच तो करायचा आहे. प्रत्येकाने आपापले काम आपली शक्ती बुद्धी आणि चातुर्य पणास लावून केले पाहिजे. वसंतराव नाईक साहेबांच्या या चिंतनीय विचारला त्यांच्या जयंतीनिमित्त माझे विनम्र अभिवादन असे माननीय आमदार श्री दादारावजी केचे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला नेतेमंडळी अनेक संघटनेचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती . प्रत्येकांनी या स्तुत्य उपक्रमाला होकारच दिला व आपल्या शुभेच्छा देऊन आर्वी टी पॉइंटला वसंतरावजी नाईक हे नाव द्यावे असे सर्वांच्या संमतीने ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड उपाध्यक्ष जगदीश पवार अंकुश जाधव ,कैलास जाधव, राजाभाऊ वानखेडे, मिलिंद हिवाळे ,कुणाल कोल्हे ,भगत, रोशन पवार ,आदींनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. कार्यक्रमाला आर्वी
तालुका गोरसेना , कारंजा तालुका गोरसेना ,आष्टी तालुका गोरसेना यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते व वर्धेचे गोर सेना पदाधिकारी उपस्थित होते.
▪ पोलीस युद्धा वृत्तसेवा▪
▪ महेश देवशोध (राठोड)▪
▪ वर्धा , जिल्हा प्रतिनिधी▪
▪73 78 70 34 72 ▪