राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्राबद्दल कृतज्ञता व्यक्त राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या दिल्या शुभेच्छा
Summary
मुंबई, दि. 1 : रुग्णसेवेच्या माध्यमातून मानवतेची सेवा करणाऱ्या समस्त डॉक्टर बांधवांना, त्यांना मदत करणाऱ्या नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ सर्वांचंच, आजच्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्तानं ऋण व्यक्त करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टर व […]
मुंबई, दि. 1 : रुग्णसेवेच्या माध्यमातून मानवतेची सेवा करणाऱ्या समस्त डॉक्टर बांधवांना, त्यांना मदत करणाऱ्या नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ सर्वांचंच, आजच्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्तानं ऋण व्यक्त करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या संकटकाळात, दिड वर्षांपासून जीवाची जोखीम पत्करुन रुग्णसेवा करणाऱ्या तमाम डॉक्टर बांधवांच्या सेवेला, त्यागाला वंदन. सर्वांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा…