वरठी पोलिस स्टेशन येथे शहर प्रतिनिधींसोबत असभ्य वागणूक, दिली जीवे मारण्याची धमकी, केली महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्याकडे तक्रार
प्रतिनिधी मोहाडी:- लोकशक्ति भ्रस्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे शहर प्रतिनिधी श्री अमर भालचंद्र वासनिक वरठी शहरामध्ये पोलिस स्टेशन मध्ये गेले असता शहर प्रतिनिधी यांच्यासोबत असभ्य वागणूक करण्यात आली. दिनांक 26 जून रोजी शहर प्रतिनिधी अमर भालचंद्र वासनिक, रा. आंबेडकर वार्ड, शहर वरठी, हे वरठी पोलिस स्टेशन मध्ये कामानिमित्त गेले असता वरठी पोलिस स्टेशन मधील शिपाई राकेश बोरकर हा पोलिस स्टेशन मध्ये हजर होता व त्याचे सहकारी उपस्थित होते. लोकशक्ति भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे शहर प्रतिनिधी श्री अमर भालचंद्र वासनिक यांनी राकेश बोरकर तसेच त्यांचे सहकारी यांना साहेब कुठे गेले म्हणून विचारणा केली असता संबंधित व्यक्तिने अपशब्द बोलून शहर प्रतिनिधींना अपमानित केले. तरी शहर प्रतिनिधी बाहेर निघाले तेव्हा त्याने अपशब्दांत शिविगाळ देऊन शहर प्रतिधींना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून शहर प्रतिनिधी अमर भालचंद्र वासनिक आपल्या गावाकडे प्रस्थान झाले. जेव्हा एका प्रतिष्ठित व्यक्तिसोबत पोलिस स्टेशन मधील कर्मचारी अशी वागणूक करत असतील तर सामान्य जनतेसोबत काय वागणूक करतील याचा तर्क निष्कर्ष संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लावावा. व अर्जदारास तात्काळ न्याय द्यावा करीता सेवेशी लेखी तक्रार लोकशक्ति भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे शहर प्रतिनिधी अमर भालचंद्र वासनिक यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना भंडारा जिल्हाधिकारी यांच्या मार्फ़त सादर केली आहे. जर अर्जदार यांना तात्काळ न्याय नाही मिळाला तर येत्या 15 दिवसांत वरठी पोलिस स्टेशन समोर लोकशक्ति भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे शहर प्रतिनिधी श्री अमर भालचंद्र वासनिक बेमुदत आमरण उपोषण करतील. जर या आमरण उपोषणात अमर वासनिक यांना व त्यांच्या परिवाराला काही कमी जास्त झाल्यास वरठी पोलिस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकारी यांची जबाबदारी राहिल तसेच गृहखात्याची जबाबदारी राहिल. अश्या प्रकारची तक्रार लोकशक्ति भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे शहर प्रतिनिधी श्री अमर भालचंद्र वासनिक यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी यांना केली आहे.