*अवैध उत्खनन करणार्यांवर सक्त कारवाईचे निर्देश* *मंत्रालयातील दालनात घेतलेल्या आढावा बैठकीत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांची केली कान उघडणी* *पाॅइंटर…* – माफियांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचे निर्देश – सॅटेलाईटद्वारे तपासणी करून अहवाल सादर कर – कागदी घोडे नाचविण्यात नाचणारे अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी
मुंबई, (शेख चांद प्रतिनिधी, ता. 29) : मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे विभागात अवैध उत्खनना संदर्भात गेल्या महिन्यात महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठक घेतली होती. त्या बैठकीत दिलेल्या सूचना नंतर केलेल्या कारवाई संदर्भात मंगळवारी मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांनी समाधानकारक कारवाई केली नसल्याची नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच अवैध उत्खनन झालेल्या ठिकाणी राज्यस्तरीय दक्षता पथक पाठवुन कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बैठकीला मंत्रालयातील महसूल विभागाचे अधिकारी तसेच मुंबई शहर उपनगर व ठाणे येथील अधिकारी उपस्थित होते.
*हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई*
मुंबई शहर, उपनगर व ठाणे विभागात अवैध उत्खनन होत असल्याच्या अनेक तक्रारी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार 23 मे रोजी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. एक महिन्यात या अवैध उत्खनन संदर्भात कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी राज्यमंत्री सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्या संदर्भात आज आढावा बैठक घेण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांनी थातूरमातूर कारवाई केल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. तसेच दक्षता पथकाद्वारे तपासणी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
*एक महिन्यानंतर ही कारवाई नाही*
अवैध उत्खनन संदर्भात 23 मे रोजी राज्यमंत्री सत्तार यांनी आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत प्रत्यक्षात किती गौण खनिज होते, किती उत्खनन झाले, किती रॉयल्टी भरलेली आहे याची माहिती जागेवर जाऊन पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र एक महिन्यानंतरही अधिकाऱ्यांनी समाधान कारक कारवाई केली नसल्याचे समोर आले. एक महिन्यानंतरही कारवाई केली नसल्यामुळे त्यांनी या वेळी नाराजी व्यक्त केली.
…………………
*कोट*
*मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार*
गौण खनिजाच्या अवैध उत्खनन यासंदर्भात गेल्या महिन्यात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र एक मात्र महिनाभरात अधिकाऱ्यांनी कारण समाधान कारक कारवाई केलेली नाही. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडेhu मी तक्रार करणार आहे.
– अब्दुल सत्तार,
महसूल राज्य महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री