हिंगण्याच्या सुरज नगरमध्ये आढळला दुर्मिळ कासव

नागपूर हिंगणा :- काल रात्री दिनांक २९ जून २०२१ ला हिंगणा वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांना रायपूर हिंगणा येथील रहिवासी व जेष्ठ पत्रकार गजानन ढाकुलकर यांचा फोन आला. की एक भला मोठा कासव सुरज नगर कॉलनीच्या रस्त्यावर चालत आहे. लगेच आशिष निनावे वनपरिक्षेत्र अधिकारी हे आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहचले. त्या कासवाला ताब्यात घेऊन वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टर मध्ये वैद्यकीय तपासणी करीता आणले.
आज ट्रान्झिट चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सय्यद बिलाल अली, डॉ.मयूर काटे पशुपर्यवेशक सिद्धांत मोरे यांनी कुंदन हाते, सदस्य वन्यजीव सल्लागार मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात व गंगाधर जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी, ट्रान्झिट सेन्टर
व आशिष निनावे वनपरिक्षेत्र अधिकारी हिंगणा
यांच्या उपस्थितीत संपुर्ण वैद्यकीय तपासणी केली.
सदर कासव हा पाण्यात राहणार असून त्याचे नाव ‘लेथ्स् साॅफ्टसेल कासव’ असे आहे. सदर कासव आपल्याकडे दुर्मिळ असून प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळणारा आहे. कासवाचे वजन २२ किलो २०० ग्रॅम असून त्याची लांबी ८३ सेंमी व रुंदी ५१ सेंमी आहे. शरीराचा संपूर्ण घेर १६५ सेंमी इतका आहे.
सदर कासवाचे स्वास्थ उत्तम असून वैद्यकीय अधिकारी यांनी स्वास्थ प्रमाणपत्र दिल्यानंतर कासवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535