युवानेते अब्दुल समीर यांच्याहस्ते नवीन रोहित्राचे लोकार्पण
Summary
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.29, सिल्लोड शहरातील विविध ठिकाणी नव्याने बसविण्यात आलेल्या रोहित्राचे लोकार्पण युवानेते अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. सिल्लोड शहराचा वाढता विस्तार व पूर्वीच्या रोहित्रावरील दाब कमी करून […]
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.29, सिल्लोड शहरातील विविध ठिकाणी नव्याने बसविण्यात आलेल्या रोहित्राचे लोकार्पण युवानेते अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिल्लोड शहराचा वाढता विस्तार व पूर्वीच्या रोहित्रावरील दाब कमी करून शहराला सुरळीत वीज पुरवठा व्हावा यासाठी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सूचना व पाठपुराव्याने शहरात विविध ठिकाणी नविन रोहित्र व विजेचे खांब बसविण्यात आले आहेत. सोमवार ( दि.28 ) रोजी शहरातील बीएसएनएल कार्यालय जवळ, औरंगाबाद नाका, माऊली नगर, इदगाह परिसर, पोलीस कॉलनी, वाघ वस्ती आदी ठिकाणच्या बसविण्यात आलेल्या रोहित्राचे लोकार्पण युवानेते अब्दुल समीर तसेच नगराध्यक्षा राजश्री निकम यांच्याहस्ते पार पडले.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने सिल्लोड शहरात विविध ठिकाणी नवीन रोहित्र व विजेचे खांब बसविण्यात आले आहेत. जवळपास 6 ठिकाणचे काम पूर्ण झाल्याने त्याचे आज लोकार्पण करण्यात आले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याने शहरालगतच्या वड्यावस्त्या प्रकाशमय झाल्या आहेत. शहरात आवश्यक तेथे रोहित्र व विजेचे खांब बसविण्याच्या सूचना वीज वितरण विभागाला देण्यात आलेल्या असून उर्वरित ठिकाणी देखील रोहित्र बसविण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती अब्दुल समीर यांनी या प्रसंगी दिली.
यावेळी नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रईस मुजावर, प्रशांत क्षीरसागर, जितू आरके, वीज वितरण विभागाचे शहर अभियंता अनिल सैवर यांच्यासह शेख इम्रान, आशिष कटारिया, फईम पठाण, गौरव सहारे, सुनील धाडगे, गोसावी टेलर आदिंची उपस्थिती होती.